राष्ट्रवादी आक्रमक,पडळकर यांच्या विरोधात मंगळवेढ्यात आंदोलन - Mangalwedha Times

Breaking

Thursday, June 25, 2020

राष्ट्रवादी आक्रमक,पडळकर यांच्या विरोधात मंगळवेढ्यात आंदोलनसुरज फुगारे । भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह टिका केली होती. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत, अशी टीका त्यांनी केली होती. यानंतर संतापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरु केली आहेत. मंगळवेढा येथे   पडळकरांचा निषेध करण्यात आला. यावेळी पडळकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  Agitations on mangalwedha against NCP aggressor, Padalkar

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. पडळकर मुर्दाबाद शरद पवार जिंदाबाद अशा घोषणाही यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.मंगळवेढा शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शहर व तालुका, काँग्रेस शहर व तालुका यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना झालेल्या घटनेचे निषेधार्थ आमदार गोपीचंद पडळकर यांचे विरूध्द योग्य कायदेशीर कारवाई करण्यात यावी व यापुढील काळात गैर कृत्य केलेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा केला जाईल या आशयाचे निवेदन देण्यात आले.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली होती. पडळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधत शरद पवार हे महाराष्‍ट्राला लागलेला कोरोना असल्याचे म्हटले होते. तसेच, शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचाही आरोपही पडळकर यांनी केला होता.

त्याचबरोबर मुंबई हे हॉटस्पॉट आहे, आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येऊ नये, अशी मागणीदेखील पडळकर यांनी केली होती. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पंढरपुरात प्रवेश बंदी आहे. चातुर्मासासाठी पंढरपुरात आलेल्या महाराजांना पंढरपूरमध्ये राहण्याची परवानगी प्रशासनाने नाकारली आहे. अशातच आषाढी एकादशी महापूजेसाठी जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार असतील तर ते योग्य नाही, असेही ते म्हणाले होते.

यावेळी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे समाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष विजय खवतोडे,शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष मुजम्मील काझी,शिवसेना तालुका प्रमुख तुकाराम कुदळे,शहराध्यक्ष सुनील दत्तू शिवसेना,शहर समन्वक नारायण गोवे, नगरपरिषद मंगळवेढा आरोग्य सभापती प्रविण खवतोडे,नगरसेवक राहूल सावजी, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष नजीर इनामदार, जमीर इनामदार, राष्ट्रवादी तालुका युवक अध्यक्ष प्रज्वल शिंदे,शहर राष्ट्रवादी कार्याध्यक्ष सोमनाथ बुरजे,माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रफुलता स्वामी, सुनीता गाडे,महानंदा धुमाळे,सजाबाई पावले, कुसुम पाटील यांचेसह विक्रम शेंबडे ,हर्षद डोरले, गणेश धोत्रे,शैलेश गोवे,पिंटू गवळी, जावेद सुतार ,अजय आसबे आदीजन उपस्थित होते.

---------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment