सोलापूर । अॅड.राजेश कांबळे खुनातील दोघा आरोपींचा जामीन फेटाळला - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, १ जून, २०२०

सोलापूर । अॅड.राजेश कांबळे खुनातील दोघा आरोपींचा जामीन फेटाळला


टीम मंगळवेढा टाईम्स । अॅड.राजेश कांबळे यांच्या खून प्रकरणातील दोघा संशयितांचा जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.के.अनभुले यांनी फेटाळला. संजय उर्फ बंटी खरटमल आणि अॅड.सुरेश चव्हाण या आरोपींचा जामीन फेटाळला.

खरटमल , चव्हाण आणि राजेश कांबळे हे तिघे मित्र होते. कांबळे यांच्या अंगावर दीड लाखाचे सोने असायचे. ते लुटण्याच्या उद्देशाने ८ जून २०१ ९ रोजी घरी बोलावून चहामध्ये झोपेच्या गोळ्या दिल्या. कांबळे बेशुद्ध पडल्यानंतर दोघांनी डोक्यात हातोडा मारून आणि कोयत्याने मारून खून केला . सोन्याचे दागिने काढून घेतले. ते सोनाराकडे विकले.

सदर बझार पोलिसात तक्रार देण्यात आली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आरोपींनी ४५ दिवसांचा अंतरिम जमीन देण्यात यावा म्हणून जामिनासाठी अर्ज केला होता . गुन्हा गंभीर असल्याने जामीन फेटाळला , सरकारतर्फे सरकारी वकील प्रदीपसिंग रजपूत यांनी बाजू मांडली.

Adv. Rajesh Kamble denied bail to two accused in the murder

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा