मंगळवेढा तालुक्यातील 'या' ग्रामपंचायतीवर येणार प्रशासक - Mangalwedha Times

Breaking

Thursday, June 25, 2020

मंगळवेढा तालुक्यातील 'या' ग्रामपंचायतीवर येणार प्रशासक


मंगळवेढा टाईम्स टीम । मंगळवेढा तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीची मुदत माहे ऑगस्टमध्ये संपत आहे दरम्यान सध्या राज्यभर कोरोना संसर्ग साथीचे थैमान सुरु असल्याने निवडणूका लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नेमणूक होणार असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.  Administrator will come to 15 gram panchayats in Mangalvedha taluka

मंगळवेढा तालुक्यातील पंधरा माहे ऑगस्ट २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे -लमाणतांडा  कात्राळ कर्जाळ , बोराळे , अ रळी , तांडोर , सलगर बु.लवंगी , डोणज , कचरेव डी , मुढवी , महमदाबाद शेटफळ , घरनिकी , मल्लेवाडी , भोसे , लेंडवे चिंचाळे या पंधरा ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे.

दरम्यान कोरोना संसर्गजन्य साथीमुळे निवडणूका लांबणीवर पडण्याची शक्यता गृहित धरून येथे प्रशासक येणार असल्याचे सांगण्यात आले . दरम्यान , माहे नोव्हेंबर २०२० मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे -मरवडे , सिध्दापूर , आसबेवाडी , हुलजंती , माचणूर , तामद डर्डी , गणेशवाडी , नंदेश्वर आदी आठ ग्रामपंचायती आहेत.

कोरोना संसर्गजन्य ही साथ नोव्हेंबर महिन्यापर्यंत नाही संपली तर या ग्रामपंचायत निवडणूकांवरही प्रश्नचिन्ह उभे राहून प्रशासक येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.


No comments:

Post a Comment