शेतकऱ्यांच्या अपघाती विमा रक्कम दहा लाख करावी ; शिवबुध्द संघटनेची मागणी - Mangalwedha Times

Breaking

Friday, June 26, 2020

शेतकऱ्यांच्या अपघाती विमा रक्कम दहा लाख करावी ; शिवबुध्द संघटनेची मागणी


राजेंद्र फुगारे । भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे.शेतकरी आपल्या कुटूंबासहित शेतात कष्ट करतात म्हणूनच या देशाची व्यवस्था चालत आलेली आहे.परंतु शेतक-यांचा नैसर्गिक,वीज, सर्पदश वन्यप्राणी किंवा इतर कारणांमुळे झालेल्या मुत्युमुळे त्यांचे कुटूंब पुर्ण उघड्यावर पडत आहे.परंतु शेतक-यांचे अपघाती विमा रक्कम दोन लाख असल्याने त्यावर कुटूंबाचा भार चालविणे कठीण आहे. म्हणून ती विमा दहा लाख करावी.याबाबतची मागणी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार,कृषीमंत्री दादा भुसे,यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी आपल्या शेतातील कामे करून घरी परत असताना पावसाळ्यात पाऊस,वीज पडून अनेक शेतक-यांचा मुत्यु झालेले आहेत.तसेच कालच चंद्रपुर तालुक्यातील शेणगाव येथील शंकर संभाजी वैद्य(३५)या युवा शेतक-यांचा मुत्यु शेतावरून येताना वीज पडून झाला.परंतु त्यांच्या कुटूंबाचा भार त्यांच्या वृध्द बापावर येऊन पडला आहे.कुटूंबातील आई,वडील,पत्नी, मुले,बहिणी यांच्या आरोग्य आणि शिक्षाणाचा खर्च त्या अपघाती विम्यामधून व्हायला पाहिजे.

परंतू महाराष्ट्र शासनाची गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना मध्ये मुत्यु झाल्यास दोन लाख रुपये,दोन्ही डोळे किंवा दोन्ही अवयव निकामी झाल्यास दोन लाख रुपये आणि एक डोळा किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख अशी भरपाई रक्कम मिळत आहे.शिवाय या योजनांची कागदपत्राची पुर्तता किचकट असल्याने बरेच शेतकरी कुटूंब या अपघाती विम्यापासून दूर राहतात.

या अपघात विमा योजनांची कागदपत्राची किचकट पणा दूर करून योग्य अंमलबजावणी करून अपघात विमा रक्कम दहा लाख करावी अशी मागणी शिवबुध्दचे संदिप मुटकुळे यांनी केले आहे.

Accident insurance for farmers should be ten lakh;  Demand of Shivbuddha Association

No comments:

Post a Comment