Solapur । क्वॉरंटाइन नियम तोडल्याप्रकरणी जिल्ह्यात 39 जणांवर गुन्हे दाखल - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, १ जून, २०२०

Solapur । क्वॉरंटाइन नियम तोडल्याप्रकरणी जिल्ह्यात 39 जणांवर गुन्हे दाखल


टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर क्वॉरंटाइन राहण्याचे नियम असताना बाहेर ये-जा केल्यामुळे ३१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.जिल्ह्यात विविध ठिकाणी ही कारवाई झाली.


कामती,बार्शी शहर,पंढरपूर तालुका,करकंब , पंढरपूर ग्रामीण प्रत्येकी एक. मंगळवेढा , माढा , टेंभुर्णी प्रत्येकी दोन याशिवाय करमाळा चार, कुडुवाडी आठ, टेंभुर्णी दोन, सांगोला चार , बार्शी तालुका तीन असे एकूण ३१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली.

पर जिल्हा व राज्य येथून जिल्ह्यांमध्ये ४६ हजार ४३९ नागरिक आले आहेत. त्यांची वैद्यकीय तपासणी करून काहीजणांना होम क्वॉरंटाइन तर काहीजणांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे.तरीही काहीजण बाहेर फिरतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.ज्या नागरिकांना क्वॉरंनटाइन होण्याचे आदेश आहेत त्यांनी नियम पाळावे. घरीच राहावे,असे आदेश आहेत.कोणी नियम तोडत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल , असे सांगण्यात आले.

A case has been registered against 39 people in the district for violating quarantine rules

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा