खळबळजनक : राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याने केला पडळकरांचा सत्कार - Mangalwedha Times

Breaking

Saturday, June 27, 2020

खळबळजनक : राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याने केला पडळकरांचा सत्कार


टीम मंगळवेढा टाईम्स । भारतीय जनता पार्टीचे (BJP) विधानपरिषचे (Vidhan Parishad) आमदार गोपीचंद पडळकर (MLC Gopichand Padalkar) यांचा सत्कार जत येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या (NCP) नगरसेवकाने केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केलेल्या जहरी टीकेमुळे गोपीचंद पडळकर हे चांगलेच चर्चेत आले आहेत.


दरम्यान पवारांवरील टीकेमुळे राष्ट्रवादी कॉन्ग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते पडळकर यांच्यावर तुटून पडले होते. मात्र राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाने (Corporater) पडळकरांचा केलेला सत्कार हा त्यांना चांगलाच अंगाशी येऊ शकतो याची चर्चा होत आहे.

जतच्या दौऱ्यावर होते पडळकर


आमदार गोपीचंद पडळकर हे जतच्या दौऱ्यावर आले असता त्यांचा हा सत्कार करण्यात आला आहे.
दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. सत्कार करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचे नाव टीमू एडके असून ते गेल्या अनेक वर्षापासून गोपीचंद पडळकर यांची भूमिका घेत असतात.

असा झाला पडळकर यांचा सत्कार

जतच्या दौऱ्यावर आले असता पडळकर यांचा सत्कार पहिल्यांदा माजी आमदार विलासराव जगताप यांच्या कार्यालयात करण्यात आला. माजी आमदार जगताप यांच्या सत्कारानंतर नगरसेवक एडके यांच्या घरी जाऊन स्वतः पडळकर यांनी भेट दिली आहे. त्यानंतर नगरसेवक यांच्या घरीच त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

काय म्हणाले होते पडळकर?

दरम्यान भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे नवनिर्वाचीत आमदार गोपीचंद पडळकर हे पंढरपूर येथे गेले असताना त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली होती. गोपीचंद पडळकर म्हणाले होते की, 'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे.' शरद पवार यांनी बहुजन लोकांवर अन्याय केला असल्याचा गंभीर आरोप देखील केला आहे. पडळकर यांनी पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलताना शरद पवारांवर टीका केली होती. पडळकरांच्या या आरोपानंतर राष्टवादी कॉंग्रेस पार्टीतील नेत्यांनी पडळकरांना उत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

पवारांवर टीकेनंतर महाराष्ट्रात निषेध


गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने निषेध करण्यास सुरुवात केली असून, अनेक ठिकाणी महाराष्ट्रात गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून, पुतळा करून जाळण्यात आला आहे. दरम्यान काही ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रस पार्टीचे नेते आक्रमक देखील झाले होते.

गुन्हा दाखल

शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर ५०५ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूर येथे शरद पवारांवर (Sharad Pawar) गंभीर आरोप करत टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती शहराध्यक्ष अमर धुमाळ यांनी फिर्याद दिली असून पडळकर यांच्यावरती दाखल झालेला हा पहिला गुन्हा आहे.

A NCP corporator from Jat felicitated Padalkar

---------------------------

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment