सोलापूरात कोरोना उपचारासाठी 9 हॉस्पिटल घोषित : आयुक्त - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, ६ जून, २०२०

सोलापूरात कोरोना उपचारासाठी 9 हॉस्पिटल घोषित : आयुक्तटीम मंगळवेढा टाईम्स । कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिकेने शहरातील 9 मोठे दवाखाने कोरोना हॉस्पिटल म्हणून घोषित केले आहेत. 11 हॉस्पिटल कोरोना हेल्थ सेंटर आणि 9 हॉस्पिटल नॉन कोरोना म्हणून घोषित करीत असल्याचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कोरोना हॉस्पिटल अश्विनी सहकारी रुग्णालय 100 टक्के म्हणजे एकूण 305 बेड, मार्कंडेय रुग्णालय 107 बेड, यशोधरा हॉस्पिटल 150 बेड, सीएनएस हॉस्पिटल 110 बेड, गंगामाई हॉस्पिटल 100 बेड, नर्मदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल 50 बेड, सिटी हॉस्पिटल 60 बेड, सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल 50 बेड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 120 बेड, असे एकूण 1 हजार 62 बेड फक्त कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवले आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशिवाय इतर खासगी दवाखान्यांतील उपचाराचा खर्च संबंधित रुग्णांनी करावयाचा आहे.

कोरोना हेल्थ सेंटर

धनराज गिरजी हॉस्पिटल 150 बेड, मोनार्क हॉस्पिटल 100 बेड, डॉ. रघोजी किडनी हॉस्पिटल 50 बेड, लोकमंगल जीवक 40 बेड, डॉ. चिडगुपकर प्रा. हॉस्पिटल लि. 50 बेड, स्पॅन हॉस्पिटल 50 कोरोना बाल रुग्णालय राखीव, सिध्देश्वर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल 50 बेड, सेंट्रल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल 50 बेड, लाईफलाईन हॉस्पिटल 50 बेड, युगंधर हॉस्पिटल 50 बेड, ई.एस.आय. हॉस्पिटल 80 बेड, रेल्वे हॉस्पिटल 40 बेड, असे एकूण 760 बेड राखीव आहेत.

कोरोना केअर सेंटर

सिंहगड इन्स्टिट्यूट 600 क्षमता, केगाव पोलिस प्रशिक्षण केंद्र 490, सोलापूर विद्यापीठ 250, भारतरत्न इंदिरा गांधी महाविद्यालय 190, ऑर्किड कॉलेज 120, गर्व्हमेंट पॉलिटेक्निक 240, वालचंद कॉलेज इंजिनिअरिंग 280, वाडिया हॉस्पिटल 75, म्हाडा इमारत जुळे सोलापूर 450, ए.जी. पाटील कॉलेज 250 अशी एकूण 2 हजार 935 बेड राखीव आहेत.

नॉन कोरोना हॉस्पिटल

मार्कं डेय सहकारी रुग्णालय 118 बेड, एस.पी. न्युरा सायन्स 50 बेड, डॉ. रघोजी किडनी हॉस्पिटल 100 बेड, स्पॅन हॉस्पिटल 59 बेड, अ‍ॅपेक्स हॉस्पिटल 50 बेड, सोलापूर कॅन्सर सेंटर 51 बेड, सिध्देश्वर कॅन्सर हॉस्पिटल 50 बेड, युनिक हॉस्पिटल 90 बेड, बिनित न्युरा काटीकर हॉस्पिटल 50 बेड, असे एकूण 618 बेड नॉन कोरोना रुग्णांसाठी राखीव आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्या आदेशाचे पालन करावयाचे असून कोणीही नियमांचा भंग केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. यावेळी उपायुक्त अजयसिंह पवार, उपायुक्त पंकज जावळे उपस्थित होते.

विडी, गारमेंट कामगारांचे 'वर्क फ्रॉम होम'

शहरात 60 हजारांवर विडी कामगार असून, त्यांना विडी कारखान्यांकडून घरपोच विडी करण्याचे साहित्य पोहोचवून विडी तयार झाल्यानंतर कारखानदारांकडून गोळा केले जाणार आहे. त्यामुळे विडी आणि गारमेंट कामगारांनीही 'वर्क फ्रॉम होम' करावयाचे आहे. शुक्रवारी दुकाने उघडताना काही नियमांचे उल्लंघन झाले; पण आता कोणते दुकान कोणत्या दिवशी उघडणार हे त्या दुकानावर स्टिकर लावले जाणार आहे. 30 जूनपर्यंत या आदेशाचे पालन करावे, अशी सूचना आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा