Breaking : सोलापुरात कोरोनाची दहशत सुरुच, रात्रीत वाढले तब्बल 40 रुग्ण - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, ३ जून, २०२०

Breaking : सोलापुरात कोरोनाची दहशत सुरुच, रात्रीत वाढले तब्बल 40 रुग्णटीम मंगळवेढा टाईम्स । सोलापुरात दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या ही वाढतच आहे. त्यातच आता आज सकाळी 8 वाजता प्राप्त झालेल्या माहितीनुसार, करोनाबाधित 40 नव्या रूग्णांची भर पडली असून आहे. तर एकूण रूग्णसंख्याही 1080 वर पोहोचली आहे.

आज सकाळी 156 जणांची चाचणी अहवाल प्राप्त होऊन त्यात 4 महिला व 36 पुरुषांना करोनाने बाधित केल्याचे दिसून आले.  मात्र आतापर्यंत 447 रूग्ण करोनामुक्त झाले आहेत.

आतापर्यंत आढळून आलेले रूग्ण प्रामुख्याने  शहरातील असून झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे आहेत.तसेच काही तालुक्यातील ग्रामीण भागातही वाढ होताना दिसत आहे.
---------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा