Solapur : 'त्या' तालुक्यात पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह सहा रुग्ण आढळले ; संख्या 12 वर - Mangalwedha Times

Breaking

रविवार, ३१ मे, २०२०

Solapur : 'त्या' तालुक्यात पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह सहा रुग्ण आढळले ; संख्या 12 वर


टीम मंगळवेढा टाईम्स । बार्शी तालुक्‍यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडताना दिसत असून रविवारी सकाळी जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या दहा जणांच्या अहवालामध्ये सहा जण पॉझिटिव्ह तर चार जण निगेटिव्ह आले, असून अद्याप 11 अहवाल प्रलंबित आहेत. बार्शी तालुक्‍यात कोरोना बाधितांची संख्या 12 झाली, असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष जोगदंड यांनी दिली.


तालुक्‍यात शुक्रवार, शनिवारी घेतलेल्या स्वॅबमध्ये रविवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात शेंद्री येथील चार, जामगाव येथील एक, रातंजन येथील एक लहान मुलगी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
जिल्हा प्रशासनाने जामगाव तसेच वैराग भागातील क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करुन शेकडो जणांना होम क्वारंटाईन, संस्थात्मक क्वारंटाइन केले असून अनेक जणांवर उपचार सुरु आहेत. बार्शी तालुक्‍यातील शेंद्री, जामगाव, वैराग या भागातील तीन रुग्ण प्रथम आढल्यानंतर ग्रामीण भागात कोरोना संसर्गाने पाय रोवले असल्याची शंका आरोग्य प्रशासनाच्या लक्षात येत होती. जामगाव येथे कोरोना बाधित वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर जामगाव येथील 11, वैराग येथील 6, बार्शी येथील खासगी रुग्णालयातील 1, शेंद्री येथील सात, बार्शी शहरातील 9, उक्कडगाव येथील 1 अशा 35 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. यातील सहा जणांचे आहवाल आज पॉझिटिव्ह आले आहेत.

कोरोना बाधितांची संख्या रविवारी 12 झाली असून आरोग्य प्रशासन, नगर परिषद, पोलिस प्रशासन, महसूल विभाग, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम यांची बैठक शनिवारी आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Six corona positive patients were again found in Barshi taluka;  At number 12

-----------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा