चिंताजनक ! गेल्या 24 तासात राज्यात 1008 नवे रुग्ण, तर 26 जणांचा मृत्यू , 'कोरोना'बाधितांचा आकडा 11500 'पार' - Mangalwedha Times

Breaking

Saturday, May 2, 2020

चिंताजनक ! गेल्या 24 तासात राज्यात 1008 नवे रुग्ण, तर 26 जणांचा मृत्यू , 'कोरोना'बाधितांचा आकडा 11500 'पार'


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । राज्यात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव सुरु झाल्यापासून प्रथमच एका दिवसात उच्चांकी १ हजार ८ कोरोनाबाधित शुक्रवारी आढळून आले आहेत. केंद्राने लॉकडाऊनची मुदत आता आणखी दोन आठवडे वाढविली असतानाच राज्यात अजूनही कोरोनाचा उद्रेक कमी होताना दिसत नाही. एकाच दिवसात १ हजारांहून नवीन रुग्ण आज प्रथमच आढळून आले आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ११ हजार ५०६ इतकी झाली आहे.
मुंबईत शुक्रवारी दिवसभरात ७५१ नवीन कोरोना बाधित आढळून आले असून ही आजवरची सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या ७ हजार ८१२ पर्यंत पोहचली आहे.ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी नवीन ७१ रुग्ण आढळून आले. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या १ हजार ११ झाली आहे.

आज राज्यात २६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. त्यात पुणे शहरातील १०, मुंबईचे ५, जळगाव जिल्ह्यातील ३, पुणे जिल्हा १, सिंधुदुर्ग १, भिवंडी महापालिका १, ठाणे मनपा १ तसेच नांदेड, औरंगाबाद मनपा आणि परभणी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. याशिवाय उत्तर प्रदेशातील एका नागरिकांचा मुंबईत मृत्यु झाला आहे.

शुक्रवारी मृत्यु पावलेल्या २६ पैकी १८ पुरुष तर ८ महिला आहे.

आज दिवसभरात १०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत़ राज्यात आतापर्यंत १ हजार ८७९ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.
--------------------

ब्रेकिंगनवनवीन ताज्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”


No comments:

Post a Comment