Big Breaking : लॉकडाऊन 5.0 ची घोषणा, ३० जूनपर्यंत लॉकडाऊन ; केंद्राकडून नियमावली जाहीर - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, ३० मे, २०२०

Big Breaking : लॉकडाऊन 5.0 ची घोषणा, ३० जूनपर्यंत लॉकडाऊन ; केंद्राकडून नियमावली जाहीर


टीम मंगळवेढा टाईम्स । देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्या (Lockdown Extension) पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून देशातील कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयांकडून याचे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहे. (Lockdown 5.0 Rules Regulation)

केंद्र सरकारकडून नवे नियम जारी करण्यात आल्या आहेत. या लॉकडाऊनमध्ये (Lockdown 5.0 Rules Regulation) अनेक नियम शिथील करण्यात आले आहे. प्रतिबंधित भाग सोडून इतर भागात प्रार्थना स्थळ, हाँटेल, रेस्टारंट सुरु होणार आहे. या विविध नियमाचं पालन करून पुढील गोष्टी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.


येत्या 8 जूनपासून या सर्व गोष्टी सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

लॉकडाऊन कसा वाढत गेला?

पहिला लॉकडाऊन - 25 मार्च ते 14 एप्रिल

दुसरा लॉकडाऊन - 15 एप्रिल ते 3 मे

तिसरा लॉकडाऊन - 4 मे ते 17 मे

चौथा लॉकडाऊन - 18 मे ते 31 मे

पाचवा लॉकडाऊन - 1 जून ते 30 जून

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठका

पहिली बैठक - 20 मार्च

दुसरी बैठक - 2 एप्रिल

दुसरी बैठक - 11 एप्रिल

तिसरी बैठक - 27 एप्रिल

पाचवी बैठक - 11 मे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा 24 मार्चला रात्री लॉकडाऊन घोषित केला होता. तो लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत होता. मग त्यामध्ये वाढ करुन तो तीन मे पर्यंत वाढवण्यात आला. त्यानंतरही भारतातील कोरोना वाढतच गेल्याने हा लॉकडाऊन 17 मेपर्यंत आणि त्यानंतर 31 मेपर्यंत वाढवण्यात (Lockdown 5.0 Rules Regulation) आला.

Lockdown 5.0 announced, lockdown until June 30 Rules issued by the Center

-----------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा