Breaking : सोलापूर महानगरपालिका आयुक्त तावरे यांची बदली ; पी.शिवशंकर नवे आयुक्त - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, २९ मे, २०२०

Breaking : सोलापूर महानगरपालिका आयुक्त तावरे यांची बदली ; पी.शिवशंकर नवे आयुक्त


टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापुरात काेरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचा फटका प्रशासकीय यंत्रणेला बसला आहे. महापालिका आयुक्त दीपक तावरे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पी. शिवशंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


सोलापूर शहरात काेरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आरोग्य व्यवस्थेचे तीन-तेरा झाले आहेत. जिल्हा प्रशासन आणि महापालिका यांच्या कामाबद्दल वरिष्ठ पातळीवरुन नाराजी व्यक्त केली जात होती. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी शहरात आढावा बैठक घेतली.

यानंतर सायंकाळी महापालिका आयुक्त तावरे यांची बदली झाल्याचा आदेश नगरविकास खात्याकडून आला.

Transfer of Solapur Municipal Commissioner Taware P. Shivshankar new commissioner

-----------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा