सोलापुरात ७२ दिवसांच्या ब्रेकनंतर उद्यापासून धावणार रेल्वे - Mangalwedha Times

Breaking

रविवार, ३१ मे, २०२०

सोलापुरात ७२ दिवसांच्या ब्रेकनंतर उद्यापासून धावणार रेल्वे


टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात २३ मार्चपासून लॉकडाऊन पुकारण्यात आला. त्यापूर्वीच २० मार्चपासून रेल्वेने आपली मालवाहतूक सेवा वगळता आपली सर्व प्रकारची सेवा बंद केली होती.

त्यानंतर लॉकडाऊनच्या ७२ दिवसांच्या ब्रेकनंतर सोमवार १ जूनपासून संपूर्ण देशभरात २०० कोविड विशेष गाड्या सुरू करण्यात येत आहे. त्यात सोलापूर विभागातून ४ रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. (There are 4 trains from Solapur division.)

या सेवेमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. सोलापुरातून मुंबई ते बंगळुरू, मुंबई ते गदग , मुंबई ते भुवनेश्वर, मुंबइ ते हैदराबाद या विशेष गाड्या धावणार आहेत. रेल्वे स्थानकावर प्रत्येक प्रवाशांची थर्मल तपासणी करूनच प्रवेश दिला जाईल, अशी माहिती वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी दिली.

Train to run from tomorrow after 72 days break in Solapur

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा