सोलापूरचे उपमहापौर काळेंना फसवणूकप्रकरणी अटक - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, ३० मे, २०२०

सोलापूरचे उपमहापौर काळेंना फसवणूकप्रकरणी अटक


टीम मंगळवेढा टाईम्स । पिंपरी - चिंचवड भागातील फ्लॅट विक्रीत फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना पुणे पोलिसांनी विजापूर नाका पोलिसांच्या मदतीने अटक केली. पुणे जिल्ह्यातील पिंपरी - चिंचवड भागातील एका महिलेला त्यांनी फ्लॅट विक्री केला होता.


तोच फ्लॅट उपमहापौर राजेश काळे यांनी इतरांनाही विक्री केल्याचे तपासात स्पष्ट झाले . याप्रकरणी पिंपरी - चिंचवड परिसरातील सांगवी पोलीस ठाण्यात काळे यांच्याविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.


६२ वर्षीय महिलेने ही तक्रार दाखल केली होती . सांगवी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची नोंद आहे . तर निगडी पोलीस ठाण्यात पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याची नोंद असल्याची माहिती आहे.


निगडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात राजेश काळे हे फरार घोषित करण्यात आले आहेत . त्याही गुन्ह्यात त्यांना शुक्रवारी सायंकाळी अटक करण्यात आली आहे . शुक्रवारी सकाळीच सांगवी पोलीस ठाण्याच्या पथकाने विजापूर नाका पोलिसांच्या मदतीने उपमहापौर काळे यांना अटक केली.

Solapur Deputy Mayor Kale arrested for fraud

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा