सोलापूर ब्रेकिंग : 'त्या' 47 जणांचे रिपोर्ट नेगिटिव्ह - Mangalwedha Times

Breaking

रविवार, ३१ मे, २०२०

सोलापूर ब्रेकिंग : 'त्या' 47 जणांचे रिपोर्ट नेगिटिव्ह


टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाबाधित रुग्णांच्या थेट संपर्कात आलेल्या ४७ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.अधिकाऱ्यांसह नागरिकांनीही सुटकेचा श्वास सोडला असून नागरिकांनी आणखी काही दिवस खबरदारी घेणे आवश्यक आहे.रेड झोनमधून आलेल्या लोकांची माहिती तत्काळ प्रशासनला द्यावी , असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले. 

मागील काही दिवस कोरोनापासून दूर असलेल्या शहर व तालुक्यात मुंबई आणि पुण्यातून आलेल्या सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते . त्यानंतर शहरासह तालुक्यातील उपरी , कासेगाव , गोपाळपूर ,करकंब या भागांत मोठी खळबळ उडाली होती. ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत तो भाग तत्काळ सील करून प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केले.

दरम्यान,कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या पंढरपूर,उपरी,चळे, कासेगाव , गोपाळपूर येथील ४७ जणांचे स्वब काल तपासणीसाठी घेतले होते . तपासणीनंतर या सर्व ४७ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने अधिकाऱ्यांसह नागरिकांनीही सुटकेचा श्वास सोडला आहे.

Reports of 47 people in Pandharpur are negative barshi


बार्शीचे १४ जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह

बार्शी तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू अन् सहा जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याने आरोग्य प्रशासनाने गंभीरपणे पाऊल उचलले असून शहर व तालुक्यातील ३५ जणांचे स्वब आज घेतले आहेत. १४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत तर २१ रिपोर्ट प्रलंबित असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष जोगदंड यांनी दिली.
जामगाव येथे कोरोनाबाधित वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर जामगाव येथील ११ , वैराग येथील सहा , बार्शीतील खासगी रुग्णालयातील एक , शेंद्री येथील सात , बार्शी शहरातील नऊ , उक्कडगाव येथील एक अशा ३५ जणांचे स्वब घेण्यात आले होते.

जिल्हा प्रशासनाने बार्शी तालुक्यातील ३५ पैकी १४ जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट केले.अद्याप २१ रिपोर्ट प्रलंबित आहेत.

Barshis 14 reports were negative

-----------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा