Lockdown : देशभरातील लाॅकडाऊन दोन आठवड्यांनी वाढविला ; रेड झोन साठी सवलत नाहीच - Mangalwedha Times

Breaking

Friday, May 1, 2020

Lockdown : देशभरातील लाॅकडाऊन दोन आठवड्यांनी वाढविला ; रेड झोन साठी सवलत नाहीच

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । लाॅकडाऊन वाढल्याने रेड झोनमधील शिथिलता येण्याची शक्यता मावळली आहे. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने कोरोना लाॅकडाऊनचा कालावधी दोन आठवडे वाढविला असून, त्याची अंमलबजावणी चार मे पासून होणार आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या दुसऱ्या लाॅकडाऊनची मुदत तीन मे रोजी संपत आहे.
प्रत्येक लाॅक डाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी देशाला संबोधून भाषण केले होते. तिसऱ्या  लाॅकडाऊनची घोषणा मोदींनी न करता एका नोटिफिकेशऩद्वारे करण्यात आली. येत्या 17 मे पर्यंत हा लाॅकडाऊन लागू राहणार आहे. ग्रीन आणि आॅरेंज झोनसाठी काही सवलतींची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठीच्या बैठका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या.
त्यानुसार मजुरांची ने-आण करण्यासाठी खास रेल्वेची व्यवस्था करण्याचे ठरले आहे.
ग्रीन आणि आॅरेंज झोनमधील जिल्ह्यासाठी स्वतंत्र सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
ग्रीन झोन म्हणजे जिथे कोरोनाची एकही रुग्ण गेल्या 21 दिवसांत सापडलेला नाही.
रेड झोन- एकूण रुग्णांची संख्या, वाढीचा वेग, टेस्टिंगचे प्रमाण यावर ठरविण्यात येणार आहे.
जे जिल्हे ग्रीन किंवा रेड झोन नसतील ते आॅरेंजमध्ये गृहित धरले जातील.
हे झोन दर आठवड्याला निश्चित केले जातील. राज्यांना रेड किंवा आॅरेंज झोनमध्ये जिल्हे समाविष्ट करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यांची तीव्रता कमी करण्याचा अधिकार राज्यांना नाही. गेल्या चोवीस तासांत देशांतील कोरोना रुग्णांचा आकडा 35 हजारांहून अधिक झाला आहे. राज्यातील एकूण 14 जिल्हे तर देशातील 120 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत.
महाराष्ट्रातील रेड झोन जिल्हे-मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औऱंगाबाद, सातारा, धुळे, अकोला
-----------------
ब्रेकिंग व नवनवीन ताज्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment