अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून लग्नासाठी दबाव,तिने केले सॅनिटायझर प्राशन ; चौघांविरूध्द गुन्हा दाखल - Mangalwedha Times

Breaking

Sunday, May 3, 2020

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून लग्नासाठी दबाव,तिने केले सॅनिटायझर प्राशन ; चौघांविरूध्द गुन्हा दाखल


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । गोणेवाडी ता.मंगळवेढा येथील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी त्याच गावातील चौघांविरूध्द मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की , सदर १७ वर्षीय पिडीत मुलीस सचिन वसंत माने हा तीचा पाठलाग करतो,तीला लग्नासाठी दबाव आणतो तसेच अक्षय बाळू कसबे , नटराज बाळू कसबे व एक अल्पवयीन मुलगा तीची छेड काढून तीच्या चारित्र्यावर संशय घेवून तीला मानसिक त्रास देतात व सचिन माने बरोबर लग्न कर म्हणून दबाव आणतात.


त्यामुळे तीला लज्जा उत्पन्न होत असल्याच्या कारणाने तीने घरातील सॅनिटायझर प्राशन केले.


या प्रकरणी ३० एप्रिल रोजी मंगळवेढा पोलिसांत फिर्याद देण्यात आल्याने पोलिसांनी सदर चार आरोपींविरूध्द भा . दं . वि . स . कलम ३५४ ( ड ) ३४ , बालकाचे लैंगिक अपराधापासूनचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८ व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक वैभव मारकड हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment