मंगळवेढा ब्रेकिंग : पुण्याहून आलेल्या 'त्या' महिले संदर्भात मोठा खुलासा - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, १६ मे, २०२०

मंगळवेढा ब्रेकिंग : पुण्याहून आलेल्या 'त्या' महिले संदर्भात मोठा खुलासा

समाधान फुगारे । मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन मंगळेवढा शहरामध्ये पुण्याहुन आलेल्या एका महिलेला ताप आणि खोकला ही लक्षणे दिसुन आलेली आहेत. त्यामुळे तिचे स्वॅब घेणेचे वैदयकीय प्रशासनाने निश्चित केलेले असल्याची माहिती प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे.

तसेच तिचे जवळचे सानिध्यात असलेल्या एकुण 7 जणांना संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये ठेवणेत आलेले आहे. त्यांचे अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या 20 जणांना त्यांचे घरातच विलगीकरण कक्षात राहणेबाबत नोटीस देण्यात आलेली आहे. सदर स्वब चे अहवाल प्राप्त झालेनंतर पुढील कार्यवाही करणेत येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान परगावाहुन नागरीक आलेचे आपले निदर्शनास आलेस त्याबाबत प्रशासनास कळवावे. परगावाहुन आलेल्या नागरीकांनी संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये रहावे.ज्या नागरीकांना संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये आणि घरामध्ये विलगीकरण कक्षामध्ये ठेवणेत आलेले आहे त्यांनी बाहेर पडु नये.

तसे केल्याचे निदर्शनास आलेस संबंधिताविरुध्द भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम,1897 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम , 2005 मधील तरतुदीनुसार कारवाई केली जाणार असून परगावाहुन आलेल्या नागरीकांनी नियम न पाळलेस त्यांचे वर नमुद कारवाईसह त्यांचे प्रवास पास रदद करुन त्यांना जेथुन आले आहेत तेथे परत पाठविणेत येईल असा इशारा देण्यात आला आहे.


मंगळवेढा शहर व परीसरातील नागरीकांना आवाहन करणेत येते की , कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये तसेच अफवा पसरवु नये.अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडु नये . घरी रहा सुरक्षीत रहा असे आवाहन प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले आहे.

-----------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा