दोन दुचाकींच्या अपघातात सलगर बुद्रूकजवळ पाच जखमी - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, ३० मे, २०२०

दोन दुचाकींच्या अपघातात सलगर बुद्रूकजवळ पाच जखमी


संतोष धायगुंडे : सलगर बुद्रूक व सलगर खुर्द या रस्त्यावर दोन दुचाकींच्या अपघातात पाच जण जखमी झाले.यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील काही जखमींना मिरज येथील भारती हॉस्पिटल येथे तर काहींना जत येथे नेण्यात आले.

शुक्रवार सकाळी ११ वाजता सलगर बुद्रूक ते सलगर खुर्द रस्त्यावरील मुस्लिम स्मशानभूमीजवळ एमएच १३ / बीवाय ४३३१ या क्रमांकाच्या दुचाकीवर फिर्यादी कैलास व सचिन बीजंत्री औषधालयातून औषध आणण्यास जात होते.तर दुसऱ्या बाजूने सलगर बुद्रूककडून सलगर खुदकड़े महमदाबाद येथील बाळू पाटील , सुशांत पाटील , विठ्ठल पाटील हे तिघे एमएच १४ / एचआर ८५०४ या दुचाकीवर जाताना हा अपघात झाला.

या अपघातात कैलास बजंत्री हे किरकोळ तर सचिन बजंत्री हे गंभीररीत्या जखमी झाले . दुसऱ्या दुचाकीवरचे तीन जण किरकोळ जखमी झाले.

या घटनेची फिर्याद कैलास बीजंत्री यांनी मंगळवेढा पोलिसात दिली आहे.

Five injured in two-wheeler accident near Salgar Budruk mangalwedha

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा