दामाजी एक्सप्रेस सांगोला विभागीय कार्यालयाचे विविध पुरस्कार जाहीर - Mangalwedha Times

Breaking

रविवार, ३१ मे, २०२०

दामाजी एक्सप्रेस सांगोला विभागीय कार्यालयाचे विविध पुरस्कार जाहीर


बाळासाहेब झिंजुरटे ।  दामाजी एक्सप्रेस (Damaji Express) सांगोला विभागीय कार्यालयाच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त सांगोला शहर व तालुक्यातील विविध मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती सांगोला विभागप्रमुख दिलीप घुले यांनी दिली.


यंदाचा जीवनगौरव पुरस्कार सांगोला अर्बन बँकेचे संस्थापक चेअरमन डॉ.प्रभाकर माळी, साहित्यरत्न पुरस्कार जि.प. प्राथमिक शाळा बनकरवाडीच्या मुख्याध्यापिका तथा कवयित्री व लेखिका प्रा.डॉ.राजेश्वरी महिमकर, समाजरत्न पुरस्कार श्री सदगुरू हॉस्पिटल, आय.सी.यु.केअर व ट्रॉमा सेंटरचे डॉ.धनंजय गावडे, कृषीरत्न पुरस्कार प्रयोगशील शेतकरी व राजलक्ष्मी ऑरगॅनिकचे संचालक अजयसिंह इंगवले, कृतिशील शिक्षक पुरस्कार सांगोला महाविद्यालयाचे प्रा.डॉ.प्रकाश बनसोडे, क्रीडारत्न पुरस्कार जेष्ठ व्हॉलीबॉलपटू व क्रीडा मार्गदर्शक अयुब मण्यार, आदर्श पत्रकार पुरस्कार सकाळचे पत्रकार दत्तात्रय खंडागळे, आदर्श सरपंच पुरस्कार चिणकेच्या सरपंच माधुरी मिसाळ, आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार अक्कमादेवी महिला संस्था, सांगोला आणि उपक्रमशिल मंडळ पुरस्कार श्रीराम तरूण मंडळ, सांगोला यांना जाहीर झाले असून चालू महिन्यात टप्याटप्याने पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या निवासस्थानी जावून त्यांना मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

सध्या कोरोना मुळे लॉकडाऊन लागू असून दामाजी एक्सप्रेसचा वर्धापनदिन सोहळयानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आला असून पुरस्काराचे वितरण ही गर्दी होऊ नये तसेच शासन आदेशाचे पालन व्हावे म्हणूनच संबंधितांच्या निवासस्थानी अथवा सोयीच्या ठिकाणी जावून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Mangalwedha Damaji Express announces various awards to Sangola Divisional Office
-----------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा