महत्त्वाची बातमी । तुम्ही व्हॉट्स अपवरती वृत्तपत्रे पाठवत असाल तर होऊ शकते मोठी कारवाई - Mangalwedha Times

Breaking

Friday, May 1, 2020

महत्त्वाची बातमी । तुम्ही व्हॉट्स अपवरती वृत्तपत्रे पाठवत असाल तर होऊ शकते मोठी कारवाई


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । वाचकांच्या सोयीसाठी अनेक वृत्तपत्रे ई-पेपरच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना यातही माहितीची चोरी करून वृत्तपत्रांच्या बनावट प्रती पीडीएफ स्वरुपात सोशल मीडियात प्रसिद्ध केल्या जात असल्याबद्दल इंडियन न्यूजपेपर सोसायटीने आज नाराजी व्यक्त केली. तसेच, हे रोखण्यासाठी काही शिफारसीही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.


लॉकडाउनच्या काळात देशातील काही माध्यम समूहांना वृत्तपत्रांचे वितरण करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेकांनी ऑनलाइन माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचण्याचे धोरण स्वीकारले आहे. यातील काही माध्यम समूह ही सेवा सशुल्क, तर काही जण नि:शुल्क पुरवित आहेत. हे ई-पेपर संबंधित माध्यम समूहांच्या संकेतस्थळांवर उपलब्ध असतात.

मात्र, या डिजीटल स्वरुपातील वृत्तपत्राचीही चोरी होत असल्याचे आढळून आले आहे. इंटरनेटवरील अनेक युजर्स ऑनलाइन वृत्तपत्र कॉपी करून त्याची पीडीएफ तयार करत आहेत आणि व्हॉट्‌सॲप, टेलिग्रामवर प्रसारित करत आहेत. यामुळे माध्यम समूहांचा महसूल बुडतो. अशाप्रकारे पीडीएफ करणे पूर्णपणे बेकायदा असून याविरोधात अनेक माध्यम समूह कारवाई करत आहेत.


या पार्श्वभूमीवर इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या सरचिटणीस मेरी पॉल यांनी माध्यम समूहांसाठी काही शिफारसी केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे-


वृत्तपत्रे अथवा त्यातील काही भाग सर्वत्र पसरविणे हे पूर्णपणे बेकायदा असून असे करणाऱ्यांविरोधात सक्त कारवाई करून त्यांना जबर दंड आकारण्यात येईल, असा इशारा माध्यम समूहांनी ॲप, संकेतस्थळ आणि वृत्तपत्रांमध्ये ठळकपणे प्रसिद्ध करावा.


याशिवाय, कोणतीही कायदेशीर कारवाई केल्यास, त्याबाबतची बातमी आणि गुन्हेगारांविरोधात सुरु असलेल्या खटल्याबाबतची माहिती प्रसिद्ध करून इतरांना असे करण्यापासून परावृत्त करावे.


बेकायदा प्रसिद्धी देणाऱ्यांविरोधात विशेषत:, व्हॉट्‌स ॲप, टेलिग्राम ॲडमिनविरोधात कायदेशीर कारवाई करावी.
ऑनलाइन चोरी रोखणारे किंवा कमी करणारे एखादे उत्पादन तयार करावे.पीडीएफ आणि इमेज डाउनलोड करण्यास मर्यादा घालून द्यावी.पाने कॉपी होण्यापासून रोखण्यासाठी जावा स्क्रिप्ट कोडचा वापर करावा

स्क्रिनवर न दिसणारा युजर आयडेंटिफायर कोड इन्सर्ट करावा, जेणेकरून सोशल मीडियावर फिरणाऱ्या पीडीएफच्या द्वारे त्या पीडीएफ अपलोड करणाऱ्यांपर्यंत पोहोचता येईल.एका आठवड्यात संकेतस्थळावरून निश्चिऱत संख्येपेक्षा अधिक वेळा पीडीएफ डाऊनलोड करणाऱ्यांची यादी तयार करावी आणि त्यांना ब्लॉक करावे.

-------------------
ब्रेकिंगनवनवीन ताज्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment