धोका वाढतोय : सोलापुरात 9 नवे रुग्ण पॉझिटिव्ह ; कोरोनाबाधितांची संख्या 111 वर - Mangalwedha Times

Breaking

Friday, May 1, 2020

धोका वाढतोय : सोलापुरात 9 नवे रुग्ण पॉझिटिव्ह ; कोरोनाबाधितांची संख्या 111 वर


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापुरातील कोरोना बाधितानची संख्या आता 111 इतकी झाली आहे. दरम्यान आज आणखीन 7 जणांना त्यांची 14 दिवसानंतरची चाचणी निगेटिव्ह आल्यानं रुग्णालयातून सोडून देण्यात आलं. कालपासून 10 जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली.

कालपर्यंत सोलापुरात 102 कोरोना बाधित रुग्णांची संख्या होती. यातील 6 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे तर इतर 95 जणांवर उपचार सुरु होते. त्यातील 3 जणांची काल कोरोना चाचणी निगेटीव्ह आली, त्यापाठोपाठ आज आणखीन 7 जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. या सर्व 10 व्यक्तींना घरी सोडण्यात आलं आहे.


आज सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत 1860 जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली आहे. यापैकी 1531 जणांची निगेटिव्ह तर 111 जणांची पॉझिटिव्ह चाचणी आली आहे.

आज 9 रुग्ण मिळाले आहेत. यात 4 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश आहे.
 यात शास्त्रीनगर
 3 पुरुष 1 महिला,
 बाळे संतोषनगर 
1 पुरुष,
 ताई चौक रवींद्र नगर नगर-1 पुरुष ,1 महिला तेलंगी पाच्छा पेठ 1 महिला, 
न्यू पाच्छा पेठ 1 महिला असा समावेश आहे.


कोरोना विषाणू संसर्गाची स्थिती लक्षात घेऊन सरकारनं राज्यनिहाय जिल्ह्यांची विविध झोनमध्ये  वर्गवारी केली आहे. यानुसार सोलापूर जिल्हा रेड झोनमध्ये हे समाविष्ट झाला आहे.

    
आज एक मे महाराष्ट्र स्थापना दिवस यानिमित्ताने  पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण झाले .कोरोना विषाणू संसर्ग सावट पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणात हा कार्यक्रम पार पडला. 

---------------
ब्रेकिंग व नवनवीन ताज्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment