बापरे...सोलापुरात आज पुन्हा तिघांचा मृत्यू ; 9 रुग्णांची भर ; बाधितांची संख्या 860 वर - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, ३० मे, २०२०

बापरे...सोलापुरात आज पुन्हा तिघांचा मृत्यू ; 9 रुग्णांची भर ; बाधितांची संख्या 860 वर


टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूरात आज सकाळी नव्याने 9 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. आज सायंकाळी नव्याने आलेल्या 9 रुग्णांमध्ये 5 पुरुष व 4 महिलांचा समावेश आहे. आज नव्याने वाढलेल्या 9 रुग्ण मुळे सोलापुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 860 झाली आहे तर आज तिघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती प्रशासनाने दिली. (Solapur corona Updated)


आज सकाळी एकूण 54 रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 9 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून 45 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 6 हजार  जण आत्तापर्यंत निगेटिव्ह आले असून 78 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या 351 असल्याची माहितीही दिली. 

सोलापूर शहर व जिल्ह्यातील 6 हजार 860 जणांची आतापर्यंत कोरोना चाचणी करण्यात आली असल्याची माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा