Breaking : सोलापुरात 3 नवे कोरोना पॉझिटिव्ह ; 'या' भागात आढळले रुग्ण संख्या 114 वर - Mangalwedha Times

Breaking

Saturday, May 2, 2020

Breaking : सोलापुरात 3 नवे कोरोना पॉझिटिव्ह ; 'या' भागात आढळले रुग्ण संख्या 114 वर


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा ।  सोलापूरात आज शनिवारी 3 नवीन कोरोनाग्रस्तांची भर झाली असून  एकूण रुग्ण संख्या 114 वर गेली असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.


आज शनिवारी 32 अहवाल प्राप्त झाले होते. त्यामध्ये 29 निगेटिव्ह आले तर 3 पॉझिटिव्ह निघाले आहेत. तर प्रलंबित अहवाल 299 आहेत.

नवे रुग्ण गवळी वस्ती,आकाशवाणी रोड 1 व पोलीस मुख्यालय,अशोक चौक 2 असे तीन रुग्ण आढळले आहेत.


कोरोनामुक्त झालेल्या 10 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आजतागायत 6 मृत्यू झाल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

--------------------
ब्रेकिंगनवनवीन ताज्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment