दामाजी साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षासह 16 जण जुगार खेळताना पोलिसांच्या ताब्यात - Mangalwedha Times

Breaking

Friday, May 1, 2020

दामाजी साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षासह 16 जण जुगार खेळताना पोलिसांच्या ताब्यात


मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा । कोरोना साथीचा प्रभाव जिल्ह्यात वाढत असताना मंगळवेढा पोलिसांची जुगार अड्ड्यांवरील कारवाईची मोहिम देखील वाढत असून तालुक्‍यातील डोणज येथे टाकलेल्या धाडीत दामाजी कारखान्याच्या माजी अध्यक्षासह 16 जण ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 3 लाख 51 हजार 680 चा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला.


याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल अजित मिसाळ यांनी दिली आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना डोणज शिवारातील महादेव कोरे यांच्या शेतातील झाडाखाली एकत्रित बसून दोन गटात तिरट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. 

यावेळी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी, हरीदास सलगर, विकास क्षिरसागर, होमगार्ड स्वप्निल शिंदे आदीच्या पथकाने टाकलेल्या धाडीत दामाजी कारखान्याचे माजी अध्यक्ष शशिकांत बुगडे, राजेंद्र कट्टीमणी, गौसपाक नदाफ, काशिनाथ लिगाडे, सोमन्ना संपागे, भीमाशंकर सुतार, आण्णाराया दसाडे, मलकारी पुजारी, शिवानंद इंगळेश्वर, शिवानंद आनंदपुरे, राजू मुलानी, सदाशिव कोळी, विष्णू संपागे, देवाप्पा बिराजदार, विजय कोळी हे जुगार खेळताना सापडले असून त्यांच्याकडे रोख रक्कम, विविध कंपनीचे मोबाईल व दुचाकी असा 3 लाख 51हजार 680 रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला.


जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू केली असताना त्याचा भंग करून , व्हायरस पसरू नये म्हणून याबाबत कोणतेही दक्षता न घेता एकत्रात गोलाकार बसून लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होऊ शकतो याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.

मंगळवेढ्याचे उपविभागिय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील , पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने सदर ठिकाणी छापा मारून तेथून रोख ३७ हजार १८० रूपये रोख , अनेक मोटार सायकली , अनेक म बाईल हॅन्डसेट आदी एकूण तीन लाख ५१ हजार ६८० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याची फिर्याद पो.कॉ.अजित मिसाळ यांनी मंगळवेढा पोलीसात दिल्याने पोलीसांनी सदर १६ जणांविरूद्ध भा . दं . वि . सं . कलम १८८ , २६९ , २७० आपत्ती व्यवस्थापन कलम ५१ ( ब ) , महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ ( ३ ) , १३५ साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम कलम २ , ३ , ४ , महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ ( अ ) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पो.ना . हरिदास सलगर हे करीत आहेत.

--------------------
ब्रेकिंगनवनवीन ताज्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment