दुकान सुरू होण्याच्या 'त्या' निर्णयामुळे ग्रामीण भागात संभ्रमाचे वातावरणात! - Mangalwedha Times

Breaking

Saturday, April 25, 2020

दुकान सुरू होण्याच्या 'त्या' निर्णयामुळे ग्रामीण भागात संभ्रमाचे वातावरणात!


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । करोनामुळे गेल्या एक ते सव्वा महिन्यापासून देशाच्या अर्थचक्राला ब्रेक लागला आहे. त्यामुळे या अर्थ चक्राला थोडी गती मिळावी व नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून केंद्रीय गृह मंत्रालयाने काही दुकाने अटी शर्तींवर आजपासून सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, याबाबत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट न केल्याने ग्रामीण भागात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशावर राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी जोर धरत आहे.


 • केंद्राच्या आदेशानुसार दुकाने उघडण्यास या अटी लागू ?


 • महानगरपालिका आणि नगरपरिषद हद्दीतील फक्त निवासी भाग व परिसरातील दुकाने या आदेशानुसार उघडता येणार आहेत.


 • जी दुकाने नोंदणीकृत आहेत त्यांनाच ही परवानगी असणार आहे.

 • दुकानात 50 टक्के कर्मचारीच काम करू शकतील.

 • त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन करायचं आहे

 • मास्क व हँड ग्लोव्हज वापरणे बंधनकारक असेल

 • शॉपिंग मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स उघडण्यास परवानगी नाही.

 • हे असेल बंद


 • करोना हॉटस्पॉट तसेच कंटेनमेंट झोनमधील दुकाने मात्र पूर्णपणे बंद राहणार आहेत. या भागांत दुकाने उघडण्याची मुभा मिळणार नाही, असे आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

 • पालिका व नगरपरिषद हद्दीतील बाजारपेठांमध्ये जी दुकाने आहेत ती 3 मे पर्यंत उघडण्यास मनाई असेल. मात्र नगरपालिका व महानगरपालिका हद्दीबाहेरची सर्व दुकाने उघडण्यास परवानगी आहे. 

 • सिंगल ब्रॅण्ड व मल्टिब्रॅण्ड मॉल्स उघडण्यासही परवानगी नसेल.


----------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment