सोलापुराकारांच्या चिंतेत वाढ आज 3 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले - Mangalwedha Times

Breaking

Wednesday, April 22, 2020

सोलापुराकारांच्या चिंतेत वाढ आज 3 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । आज तीन बाधित व्यक्ती मिळून आल्या असून त्यापैकी दोन या इंदिरानगर परिसरातील आहेत जी महिला याआधी मृत पावली होती त्यांच्या संपर्कातील या दोन व्यक्ती आहेत तर तिसरी व्यक्ती ही शिवगंगा नगर येथील आहे असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी स्पष्ट केले.


सोलापुरात कोरोना रुग्णाचा आकडा 33वर आज 3 नव्या रुग्णांची भर, मृतांचा आकडा पोहचला 3 वर अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बुधवारी संध्याकाळी दिली.


सोलापुरातील आयसोलेशन वॉर्डमध्ये   900  रुग्ण असून तपासणी पूर्ण केलेल्या  644 व्यक्ती ,यांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी   711 व्यक्ती निगेटिव्ह आहेेेत तर   33 व्यक्ती पॉझिटिव्ह त्यामध्ये 3 मृत व्यक्तीचा समावेश आहे.दिवसभरात 90 रिपोर्ट ची तपासणी करण्यात आली त्यापैकी 87 रिपोर्ट निगेटिव्ह आढळून आले अशीही माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.150 येणे बाकी आहेत.

------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment