संतापजनक ; अंगावर पेट्रोल टाकून पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला ; सोलापूर जिल्ह्यातील घटना - Mangalwedha Times

Breaking

Wednesday, April 29, 2020

संतापजनक ; अंगावर पेट्रोल टाकून पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला ; सोलापूर जिल्ह्यातील घटना


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोनाच्या प्रादुर्भावापासून नागरिकांना कोणता धोका निर्माण होऊ नये यासाठी डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस सरंक्षण करणाऱ्या पोलिसांवर हल्ले होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.माळशिरस तालुक्यातील वेळापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचार्‍याला मळोली येथे मारहाण झाल्याची घटना घडली. जावेद नजीर जमादार असे मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.


'कोरोना' रोगाच्या पार्श्वभूमीवर वेळापुर पोलीस स्टेशनचा साळमुख बिट अंमलदारास मदतनीस म्हणून नेमणूकीस असलेला कर्मचारी जावेद नजीर जमादार हे मळोली गावामध्ये पेट्रोलिंग करत असताना आरोपी अरुणसिंह फत्तेसिंह जाधव (रा. मळोली) याने कारमधून येऊन जातीवाचक शिवीगाळ करून काही दिवसांपूर्वी साळमुख येथील भावाचे हॉटेल चेक केल्याचा राग मनात धरून २८ एप्रिल रोजी रात्री ९ च्या सुमारास मळोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशद्वारासमोर लाथा बुक्क्यांने, हाताने मारहाण करून ब्लेडच्या पानाने हातावर, तोंडावर वार करून जखमी करून फिर्यादीचा मोबाईल फोडून अंगावर पेट्रोल टाकण्याचा करण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी वेगवेगळ्या कलमान्वये वेळापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून आरोपी अरुणसिंह फत्तेसिंह जाधव (मळोली) यास अटक केल्याची माहिती सपोनि दीपक जाधव यांनी दिली. गुन्ह्याचा तपास प्रभारी अधिकारी सपोनि दीपक जाधव हे करीत आहेत.

------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment