पाणी आणण्यासाठी गेलेल्या विवाहितेचा पाय घसरल्याने पाण्यात बुडून मृत्यू - Mangalwedha Times

Breaking

Wednesday, April 29, 2020

पाणी आणण्यासाठी गेलेल्या विवाहितेचा पाय घसरल्याने पाण्यात बुडून मृत्यू

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । शेततळयावर पिण्याचे पाणी आणण्याकरीता गेलेली विवाहिता पाय घसरून पाण्यात पडून बूडून मयत झाल्याची घटना मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथे घडली असून काजल गणेश रणदिवे असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मित मयत अशी पोलिसांत नोंद केली आहे. 


या घटनेची हकिकत अशी , यातील खबर देणारे दिलीप रणदिवे यांच्या लक्ष्मी दहिवडी येथील शेतातील शेततळयामध्ये यातील मयत काजल रणदिवे ही दि.२८ रोजी दपारी १ च्या दरम्यान पिण्याचे पाणी आणण्याकरीता गेली असता पाय घसरून तळयातील पाण्यात पडून बूडून मयत झाली असल्याचे दिलेल्या खबरीमध्ये म्हटले आहे.


पोलिसांनी मयताचा व्हिसेरा राखून ठेवला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक सचिन खटके हे करीत आहेत.

---------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment