Lockdown : सोलापुरात ८ मे पर्यंत राहणार जमावबंदी - Mangalwedha Times

Breaking

Thursday, April 23, 2020

Lockdown : सोलापुरात ८ मे पर्यंत राहणार जमावबंदी


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापुरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १० दिवसांत ३३ झाली. रुग्ण वाढू लागल्याने सोलापुरात ८ मे पर्यंत जमावबंदी लागू राहील.या काळात पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊ नयेत, असे आदेश पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी बुधवारी (ता. २२) काढला.

कोरोना या विषाणूच्या संसर्गाची साखळी खंडीत करण्याच्या हेतूने देशभर ३ मेपर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे.त्याचवेळी नागरिकांनी लॉकडाउनमध्ये विनाकारण घराबाहेर पडू नये म्हणून संचारबंदी लागू झाली. आता ३ मेनंतर सर्व व्यवहार सुरळीत होतील,अशी नागरिकांना आशा आहे.दरम्यान, लॉकडाउननंतर सोलापुरलगत असलेल्या पुणे,नगर,कोल्हापूर, सांगली,सातारा,उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले.परंतु,सोलापुरात लॉकडाउननंतर तब्बल २१ दिवस एकही रुग्ण नव्हता.


मात्र, मागील ११ दिवसांत ग्रीन झोनमधील सोलापूर रेड झोनमध्ये आले. आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून शहरात सारीचाही प्रादुर्भाव वाढू लागला आहे.पाच्छा पेठेत सर्वाधिक रुग्ण सापडल्यानंतर तेथील रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती व रुग्णांची ट्रॅव्हल हिस्ट्री काढण्याचे काम पोलिसांनी युद्धपातळीवर हाती घेतले.मात्र, रुग्णांकडून अचूक माहिती मिळत नसल्याने अद्याप नेमकी ट्रॅव्हल हिस्ट्री समोर आलेली नाही.


त्यामुळे सारी व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची खबरदारी म्हणून शहरातील संचारबंदी ३ मेनंतरही पुढील पाच दिवस जमावबंदीचे आदेश जैसे थे राहणार आहे. या कालावधीत मिरवणुका,सभा,लग्न समारंभ, अंत्ययात्रा,मोर्चे,रॅली,आंदोलने, धरणे करणे, निवेदने देणे, यावर निर्बंध असतील.२४ एप्रिल ते ८ मेपर्यंत पाच व पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र दिसणार नाहीत, अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला आहे.


बंदोबस्तासाठी येणार राज्य राखीव दल

मागील ११ दिवसांत सोलापुरात कोरोना व सारी या आजाराचे ३३ रुग्ण विविध भागात आढळले आहेत.दिवसेंदिवस त्यात वाढ होत असल्याने त्या त्या प्रतिबंधित परिसरात पोलिसांची गरज आहे. आता जमावबंदीही वाढवली आहे.त्यामुळे राज्य राखीव दलाच्या तुकडीची मागणी केली आहे,असे पोलिस आयुक्त अंकूश शिंदे यांनी सांगितले.

शहरातील १५ ठिकाणी नो एन्ट्री पाच्छा पेठ,रविवार पेठ,इंदिरा नगर,शेळगी (कमला नगर), शास्त्रीनगर,कुर्बान हुसेन नगर,नई जिंदगी,शिवगंगा नगर,बापूजी नगर,मदर इंडिया झोपडपट्टी, मोदी खाना, शनिवार पेठ हा परिसर (प्रत्येकी एक किलोमीटर) प्रतिबंधित करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवांसाठी विशेष परवानगी घेऊनच या परिसरातील व्यक्तींना बाहेर पडता येणार.

No comments:

Post a Comment