CoronaVirus : सोलापुरातील 'या' भागात कोरोनाचा शिरकाव! - Mangalwedha Times

Breaking

Wednesday, April 22, 2020

CoronaVirus : सोलापुरातील 'या' भागात कोरोनाचा शिरकाव!


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापुरात मंगळवारी सारीचा पहिला बळी गेला आहे. शास्त्रीनगरातील ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा सारीने मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिली. त्याचबरोबर मोदीखाना, शनिवारपेठ, जोशीगल्ली आणि मदर इंडिया झोपडपट्टीत नव्याने ४ रुग्ण पॉझीटीव्ह आढळले आहेत.

सोमवारी कोरोनाचे दहा रुग्ण पॉझीटीव्ह आले आहेत. अशाप्रकारे कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या २५ वर पोहोचली गेली होती. यातील दोन रुग्ण यापूर्वीच मरण पावले आहेत तर २३ जणांवर उपचार सुरू आहेत. आता नव्याने पाच पॉझीटीव्ह आढळले पण त्यातील ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. या वृद्धाची सारीची टेस्ट पॉझीटीव्ह आली आहे. त्याचबरोबर आता नव्याने मोदीखाना येथील एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आता हा भाग प्रतिबंधीत करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.

सोलापुरात कोरोणाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संचारबंदी कडक केली आहे. तरीही नागरिक घराबाहेर पडत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग किती भयानक आहे हे नव्याने आढळून येणाºया रुग्णांवरून दिसून येत आहे. या विषाणूचा संसर्ग कसा होतो हे लवकर दिसून येत  नसल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment