CoronaVirus : सोलापुरात कोरोना रुग्णांची संख्या 37 वर ; आज 4 नवे रुग्ण पॉझिटिव्ह - Mangalwedha Times

Breaking

Thursday, April 23, 2020

CoronaVirus : सोलापुरात कोरोना रुग्णांची संख्या 37 वर ; आज 4 नवे रुग्ण पॉझिटिव्ह


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत जात असताना आज 4 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याची माहिती नूतन पालकमंत्री दत्तात्रय बरणे यांनी सांगितली.

सोलापुरात कोरोना रुग्णाचा आकडा 37 वर आज 4 नव्या रुग्णांची भर, मृतांचा आकडा पोहचला 3 वर अशी परिस्थिती सध्या सोलापुरातील आहे.


पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या उपस्थितीत आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. यात त्यांना सध्य कोरोना स्थिती सांगण्यात आली.             


पालकमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं, सोलापुरात कोरोना बाधितांची संख्या 37 वर पोहोचली आहे ती वाढू नये यासाठी प्रशासन प्रयत्न करतोय.
 

शहरात सारी रुग्णांचे सर्व्हे करण्याचं कामही सुरू झाले आहे. हे सर्व्हे सोमवारी संध्याकाळपर्यंत पूर्ण होतील. तोपर्यंत सध्याची काटेकोर संचारबंदी शिथिल होणार नाही, असेही त्यांनी एका उत्तरात स्पष्ट केलं आहे.


त्यामुळे सध्याची संचारबंदी वाढणार अशी शक्यता आहे.सोलापूरच प्रशासन सायंकाळपर्यंत यावर काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment