सरकारी कार्यालयांत १० टक्के उपस्थिती;महापालिका क्षेत्राबाहेरील उद्योगांना परवानगी - Mangalwedha Times

Breaking

Saturday, April 18, 2020

सरकारी कार्यालयांत १० टक्के उपस्थिती;महापालिका क्षेत्राबाहेरील उद्योगांना परवानगी


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । राज्यात २० एप्रिलनंतर टाळेबंदीचे स्वरूप कसे राहील, याबाबत राज्य सरकारने नवी अधिसूचना जारी के ली आहे. काही भागांत पुरेशी काळजी घेऊन तसेच अटी व शर्तींच्या अधीन राहून महानगरपालिका क्षेत्राबाहेरील औद्योगिक, व्यावसायिक उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत. सरकारी कार्यालयांत १० टक्के  उपस्थिती बंधनकारक करण्यात आली असून, धार्मिक उत्सव, प्रार्थनास्थळांवरील गर्दी, मेळावे, खेळाच्या स्पर्धा, परिषदा, सभा यांच्या आयोजनावरील बंदी कायम राहील.

टाळेबंदीत २० एप्रिलनंतर शिथिलता आणण्याबाबत राज्य सरकारने नवीन अधिसूचना काढली आहे. अर्थव्यवस्थेचे चक्र हळूहळू फिरण्यास मदत होणार आहे. करोनाचासामना करणे हे मूळ उद्दिष्ट अबाधित ठेवत बाधित क्षेत्र घोषित केलेली ठिकाणे वगळून इतरत्र स्थानिक प्रशासनाच्या अधिकारात हे सुधारित आदेश लागू राहतील. सुरक्षित अंतर ठेवणे, स्वच्छतेचे नियम पाळणे, नियमित मास्क घालणे या व अशा कोणत्याही बाबी शिथिल करण्यात आलेल्या नाहीत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. कुठल्याही कारणांसाठी गर्दी झालेली चालणार नाही. धार्मिक उत्सव, प्रार्थनास्थळांवरील गर्दी, मेळावे, खेळाच्या स्पर्धा, परिषदा, सभा यांच्या आयोजनाला परवानगी असणार नाही. लोकांना अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू विनाअडथळा मिळत राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

एसटी, ‘बेस्ट’ची विशेष सुविधा

सरकारी कार्यालयातील १० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. मुंबईत मंत्रालयात येण्या-जाण्यासाठी ‘एस.टी.’ आणि ‘बेस्ट’ ची विशेष बस सुविधा असेल.

No comments:

Post a Comment