सोलापुरातील पुरस्कार सोहळा रद्द करणार धान्याची मदत - Mangalwedha Times

Breaking

Monday, April 13, 2020

सोलापुरातील पुरस्कार सोहळा रद्द करणार धान्याची मदत


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । श्री रमा जगदीश महिला बहुउद्देशीय महिला उत्कर्ष संस्थेच्यावतीने व सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनतर्फे दरवर्षी क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल देण्यात येणारे पुरस्कार यंदा रद्द करून त्याऐवजी गरजूंना धान्याची मदत केली जाणार असल्याचे चेस असोसिएशनचे सचिव शरद नाईक यांनी सांगितले . सध्या कोरोनामुळे कष्टकऱ्यांची आर्थिक नाकेबंदी झाली आहे .

अशा गरजूंना संस्थेच्या माध्यमातून धान्याच्या स्वरूपात मदत देण्यात येणार आहे . तसेच या पुढील काळातही अशाच गरजू लोकांना मदत केली जाणार आहे . शिवाय पंतप्रधान मदत निधी , मुख्यमंत्री मदत निधीसाठीही निधी जमा केला जाणार आहे . तरी समाजातील दानशूर व्यक्तींनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे .

No comments:

Post a Comment