विना परवाना इतर राज्यातून प्रवास केल्याप्रकरणी राजस्थानच्या दोघांविरूध्द गुन्हा दाखल - Mangalwedha Times

Breaking

Saturday, April 18, 2020

विना परवाना इतर राज्यातून प्रवास केल्याप्रकरणी राजस्थानच्या दोघांविरूध्द गुन्हा दाखल


मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा । जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करून इतर राज्यातून जिल्हयातून मोटर सायकलवर प्रवास केल्याप्रकरणी भैरू लाला बैरवा,प्रभू लाला बैरवा( दोघे रा.राजस्थान) यांच्याविरूध्द  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या घटनेची हकिकत अशी,सोलापूरचे जिल्हा दंडाधिकारी यांनी दि.14 एप्रिलपासून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जमावबंदी आदेश जारी केला आहे.पाच  किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास तसेच राज्यातून,जिल्हयातून,तालुक्यातून दुसर्‍या ठिकाणी प्रवास करणार नाही असे आदेश असतानाही आरोपी भैरू बैरवा व प्रभू बैरवा या दोघांनी कर्नाटक राज्य,कोल्हापूर येथून राजस्थान,मध्यप्रदेश,मंगळवेढा असा मोटर सायकलवरती डबलशीट प्रवास केला आहे.दरम्यान,मंगळवेढा ते पंढरपूर रोडने गोपाळपूर येथे ते जात असताना ते पंढरपूर पोलिसांना मिळून आल्याने त्यांना मंगळवेढा पोलिस ठाण्याकडे हस्तांतरीत केले आहे.

त्यांच्याकडे प्रवासाबाबत कोणतीही परवानगी नसताना ते बेकायदेशीरपणे प्रवास करीत असल्याचे उघड झाल्याने पोलिस उपनिरिक्षक दत्तात्रय पुजारी यांनी त्या दोघांविरूध्द शासनाच्या आदेशाचा भंग केला म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदयांर्तगत गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास पोलिस नाईक सुरवसे करीत आहेत.
----------

No comments:

Post a Comment