अन्न सुरक्षा योजनेतील धान्य वाटपात मंगळवेढा जिल्हयात दुसर्‍या क्रमांकावर - Mangalwedha Times

Breaking

Saturday, April 18, 2020

अन्न सुरक्षा योजनेतील धान्य वाटपात मंगळवेढा जिल्हयात दुसर्‍या क्रमांकावर


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा तालुक्यातील 106 स्वस्त धान्य दुकानातील 81 दुकानातून अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येकी 5 किलो मोफत तांदुळ वाटण्यात आला असून हा तांदूळ वाटप व्यवस्थित होतो की नाही यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 106 जि.प.शिक्षकांची नेमणूक करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान सोलापूर जिल्हयात धान्य वाटपामध्ये मंगळवेढा हा दुसर्‍या क्रमांकावर असल्याचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी सांगितले.


मंगळवेढा तालुक्यात कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर 106 स्वस्त धान्य दुकानापैकी शुक्रवार अखेर 81 दुकानातून अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना 5 किलो प्रमाणे मोफत तांदूळ देण्यात आला आहे.दि.10 एप्रिलपासून तांदूळ वाटण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे.स्वस्त धान्य दुकानदारांनी वेळ पडल्यास रात्री उशीरापर्यंत दुकाने चालू ठेवून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची खबरदारी घेवून  तांदूळ वाटप करण्याच्या सक्त सूचना तहसीलदार यांनी दिल्या आहेत.


लाभार्थ्यांना तांदूळ व्यवस्थित वाटप होतो की नाही याचे निरिक्षण करण्यासाठी 106 जि.प. शिक्षकंाची नेमणूक करण्यात आली आहे.सध्या तांदळाचे वाटप युध्द पातळीवर सुरु असून जिल्हयात मंगळवेढा तांदूळ वाटपामध्ये दुसर्‍या क्रमांकावर आला आहे.

No comments:

Post a Comment