दुर्दैवी घटना : बहिण भावाचा विहिरीत पडून मृत्यू - Mangalwedha Times

Breaking

Monday, April 27, 2020

दुर्दैवी घटना : बहिण भावाचा विहिरीत पडून मृत्यूमंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कुमठे गावातील भोपळे वस्तीत दोघे बहिण-भाऊ खेळत असताना अचानक विहिरीत पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.ही घटना रविवारी दुपारी तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान घडली.स्वराज सुजित भोपळे (वय-३) स्वराली (राधा) सुजित भोपळे (वय-२)दोघे रा.भोपळे वस्ती,कुमठे असे मरण पावलेल्या बहीण-भावंडाची नावे आहेत.


रविवारी दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या समारास स्वराज व स्वराली हे भोपळे वस्तीतील शेतातील विहिरीजवळ खेळत होते.खेळत असतानाच ते दोघेही नकळत विहिरीतील पाण्यात पडले.


ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांना विहिरीतून बाहेर काढून वडिलांनी बेशुद्धावस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले आहे.


या घटनेची प्राथमिक नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाले आहे.चिमुकल्या बहीण-भावांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

---------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment