मंगळवेढा : lockdown काळात अनाधिकृतपणे मातीचे उत्खनन,जे.बी.सी व टिपर महसूल विभागाने केला जप्त - Mangalwedha Times

Breaking

Saturday, April 25, 2020

मंगळवेढा : lockdown काळात अनाधिकृतपणे मातीचे उत्खनन,जे.बी.सी व टिपर महसूल विभागाने केला जप्त


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । बठाण येथून बेकायदेशीररित्या जवळपास 50 ब्रास माती उचलल्याचा प्रकार घडला असून तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या आदेशाने माती उपसणारा जेसीबी व टिपर जप्त करून संबंधित महिला शेतकरी यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे.


बठाण येथील गट क्रमांक 21/2 मधील शेतातून बेकायदेशीररित्या माती उचलली जात असल्याची माहिती तहसीलदार स्वप्नील रावडे यांना प्राप्त होताच त्यांनी नायब तहसीलदार सुधाकर मागाडे,मंगळवेढा मंडल अधिकारी सोमनाथ जाधव,तलाठी पुरुषोत्तम पुजारी यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले.

या पथकाने सदर ठिकाणी जावून  प्रत्यक्ष पाहणी करून उचललेल्या 50 ब्रास मातीच्या खड्डयाचा पंचनामा केला.तसेच महिला शेतकरी, टिपर व जे.सी.बी. चालक यांचा जबाब नोंदविला आहे.जे.सी.बी. हा विना क्रमांकाचा असून तो वटवटे ता. मोहोळ येथील आहे तर टिपर हा मंगळवेढयातील आहे. यामध्ये बाजार भावाच्या पाच पटीने दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान,राष्ट्रीय महामार्गाचे ठेकेदार दिलीप बिल्डकॉम यांनी मरवडे शिवारातील सिध्दा आप्पा जाधव यांचे जमीन गट क्रमांक 210/1 मधून दि.1 मार्च रोजी 540 ब्रास मुरुम उचलल्या प्रकरणी सदर ठेकेदाराला तहसीलदार यांनी महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम 48/7 अन्वये आपल्यावर कारवाई का करण्यात येवू नये अशा मजकूराची नोटीस बजावण्यात आली आहे.

यापुर्वीही तळसंगी हद्दीतून तलाव परिसरातून मुरूम उचलल्या प्रकरणी दिड कोटीचा दंड तहसीलदार यांनी केला होता.याबाबत नागरिकांनी पुणे महसूल आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर ही जंबो कारवाई करण्यात आली.कारवाईची नोटीस देवून बरेच दिवस उलटूनही या कारवाईवर अदयापही प्रश्‍नचिन्हच असल्याने नागरिकांमधून उलट सुलट चर्चा सुरु आहे.

--------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment