दुर्दैवी घटना : कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा पाण्यात पडल्याने मृत्यू - Mangalwedha Times

Breaking

Sunday, April 19, 2020

दुर्दैवी घटना : कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा पाण्यात पडल्याने मृत्यूमंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील दोन मुली बंधाऱ्यातील पाण्यात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या.मात्र त्या पाय घसरल्याने त्या बंधाऱ्यातील पाण्यात पडल्या.त्यापैकी एकीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला आहे. 
तर दुसरीचा शोध सुरु आहे.मयत झालेल्या मुलीचे नाव आरती निलेश सोनवणे (वय १०) असे आहे.


याबाबत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार , पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या आरती निलेश सोनवणे आणि वैष्णवी महादेव गाडे या मुली आज रविवारी सकाळी नऊ वाजता नेहमी प्रमाणे घराजवळील बंधाऱ्यातील पाण्यात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या.


त्याचा पाय घसरुन दोघीही बंधाऱ्यातील पाण्यात पडल्या.बराच वेळ झाला तरी मुली परत आल्या नाहीत. हे लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरु केला. गावकऱ्यांनी बंधाऱ्यातील पाण्यातून आरती नीलेश सोनवणे हिचा मृतदेह बाहेर काढला आहे. तर वेष्णवी महादेव गाडे हिचा शोध सुरु आहे.ही घटना समजताच पोलीसांनी घटना स्थळी भेट दिली आहे.

------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment