परप्रांतिय कामगारांनी केली पोलिसांवर दगडफेक; चार पोलीस जखमी - Mangalwedha Times

Breaking

Friday, April 17, 2020

परप्रांतिय कामगारांनी केली पोलिसांवर दगडफेक; चार पोलीस जखमी


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । राष्ट्रीय महामार्गावर काम करणाऱ्या परप्रांतीय मजूर कामगारांनी पगार मिळत नसल्याच्या कारणावरून कंपनीच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांवर दगडफेक केली़ यात एका खासगी वाहनांसह शासकीय वाहनांची तोडफोड करून नुकसान केल़े़. या हल्ल्यात चार पोलिस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ हा धक्कादायक प्रकार जुनोनी (ता. सांगोला) गावानजिक घडला आहे़ सहाय्यक पोलीस फौजदार विलास कांबळे, पोलीस नाईक विजय थिटे, पोलीस नाईक राजू चौगुले सह अन्य एक असे जखमी चार पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

सोलापूर - सांगली राष्ट्रीय महामार्गावर परप्रांतीय मजूर कामगार मोठ्या संख्येने कामावर आहे़ दरम्यान, या मजुरांचा पगार होत नसल्याने मजूर कामगार व व्यवस्थापक बाचाबाची सुरु असताना पोलिसांना पाचारण करण्यात आले.


यावेळी पोलिस कामगारांना समजून सांगत असताना ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, अखेर पोलिस आल्याचे पाहून संतापलेल्या कामगारांनी ठेकेदाराच्या गाड्या आणि कार्यालयाची तोडफोड सुरू केली़ त्यांनी एवढ्यावरच न थांबता पोलिसांवरही दगडफेक सुरू केली़ मजूर कामगार मोठ्या संख्येने असल्याने व पोलिसांची संख्या तोकडी असल्याने त्यांनी पोलिसाच्या खाजगी कारसह शासकीय वाहनाची तोडफोड करून पलटी केले़ या हल्ल्यात चार पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.


या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राजेश गवळी, पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी घडल्या प्रकाराची माहिती घेऊन व्यवस्थापकाला ताब्यात घेतले. गुरूवारी रात्री उशिरा व्यवस्थापकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.


-------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”


हेही वाचा-CoronaVirus : नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : तहसीलदार रावडे

वाचा-SolapurUpdate : 'त्या' पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील 50 जणांना घेतले ताब्यात 


No comments:

Post a Comment