Coronavirus : सोलापुरात कोरोनाबरोबर 'या' नवीन आजाराचा शिरकाव - Mangalwedha Times

Breaking

Monday, April 20, 2020

Coronavirus : सोलापुरात कोरोनाबरोबर 'या' नवीन आजाराचा शिरकाव


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापूर जिल्ह्यात आणखी ६ कोरोना पॅझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता सोलापूर शहरातील कोरोना बाधीतांची संख्या आता 21 झाली आहे.कालपर्यंत सोलापुरात 2 मृत्यू आणि 13 जणांवर उपचार अशी एकूण कोरोना बाधीतांची संख्या 15 होती; त्यात आज 6 रुग्णांची भर पडली आहे. याबाबतची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज (20 एप्रिल) दुपारी दिली. 


दरम्यान औरंगाबाद नंतर सोलापुरात देखील सारी या आजाराची लागण झाली आहे . सरीचे २ रुग्ण सोलापपुरात आढळले आहेत. त्यामुळे दक्षता म्हणून सोलापुरात पुढील ४ दिवस कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

सोलपुरात 'सारी'चे २ रुग्ण
मिळालेल्या माहितीनुसार , आज नवीन आढळलेल्या रुग्णांमध्ये बापूजी नगर, भद्रावती पेठ येथील प्रत्येकी एक तर कुर्बान हुसेन झोपडपट्टी तसेच पाच्छा पेठ येथील दोन रुग्णांचा समावेश आहे.


आज आढळलेल्या रुग्णांमध्ये दोन रुग्ण सारी या आजरामधील आहेत तर इतर रुग्ण हे यापूर्वी जे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत त्यांच्या संपर्कात आलेले आहेत यात ४ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे.

दरम्यान कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले चारही परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तसेच आत्तापर्यंत सोलापुरात कोरोना संशयित 778 जणांची ची चाचणी घेण्यात आली . 569 जणांचे अहवाल आले आहेत तर 209 जणांचे अहवाल येणे आहेत. प्राप्त 569 पैकी 548 जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे तर 21 जणांचीची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.


दुपारी २ पासून पूर्णपणे संचारबंदी आदेश लागू

सोलापुरात खबरदारीचा उपाय म्हणून आज दुपारी दोन वाजल्यापासून पूर्णपणे संचारबंदी आदेश लागू झाले आहेत. अत्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा आता 23 एप्रिल च्या मध्यरात्रीपर्यंत बंद राहतील ,यात किराणा दुकान ,खाजगी औषध दुकान, बँका, भाजीपाला यांचाही समावेश आहे.पेट्रोल पंपावर ही आता केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, वैद्यकिय विभागाची वाहनं यांनाच पेट्रोल मिळणार आहे .इतरांना पेट्रोल मिळणार नाही.


सोलापूरकरांनी आज पासूनच्या संचारबंदीचा अत्यंत काटेकोरपणे पालन करावं .रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी एकटे किंवा एकत्रितपणे येणे टाळावेच असे आवाहनही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केलं आहे. कोरोना ची वाढती साखळी ब्रेक करण्यासाठी यापेक्षा वेगळा उपाय सध्या तरी नाही असेही ते म्हणाले.

--------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment