सोलापुरात आज एकही 'पॉझिटिव्ह' रुग्ण आढळला नाही;91 व्यक्ती 'आयसोलेशन' वार्डात - Mangalwedha Times

Breaking

Monday, April 13, 2020

सोलापुरात आज एकही 'पॉझिटिव्ह' रुग्ण आढळला नाही;91 व्यक्ती 'आयसोलेशन' वार्डातमंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । पाच्छा पेठ परिसरातील आज 3700 घरे आणि जवळपास 29 हजार लोकांचे सर्वेक्षण जिल्हा प्रशासनाने केलेले आहे.कोरोना संसर्गित मृत्यू पावलेल्या किराणा दुकानदार च्या प्राथमिक संपकति असलेल्या 91 जणांचा स्वॅप घेऊन त्यांना आयसोलेशन वॉडति दाखल करण्यात आले आहे.तर सेकंडरी संपर्कात असलेल्या 30 व्यक्तींना इन्स्टिट्यूशनल क्वॉरंटाइनमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
या व्यक्तींचे रिपोर्ट येणे बाकी असल्याचेही त्यांनी सांगितले. काल सोलापुरात कोरोना संसर्गित एका व्यक्तीचा मृत्यू झाला. सोलापूर शहरातील पाच्छा पेठ परिसरातील 56 वर्षीय किटाणा दुकान चालकाचा कोटोना संसर्गजन्य आजाराने मृत्यू झाला.सदर व्यक्तीला निमोनिया झाल्याने शुक्रवाटी दिनांक 10 एप्रिल रोजी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


शनिवारी दिनांक  एप्रिलच्या पहाटे एक वाजता उपचारा दरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला . सदर व्यक्तीला कोटोनाचा संसर्ग झाल्याचा संशय डॉक्टरांना आधीच आला होता . त्यामुळे त्यांनी या व्यक्तीचे अगोदरच तपासणीसाठी नमुने घेतले होते . रविवारी दुपाठी साडेतीनच्या दरम्यान या दुकान चालकाचा कोटोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकाटी मिलिंद शंभरकर यांनी दिली होती . सोलापुरातील कोटोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण रविवाटी आढळला आणि त्याचा बळीही गेला.


तब्बल 60 पथकाद्वारे तपासणी सुरू पाच्छा पेठ परिसरातील नागरिकांची तपासणी करण्यासाठी 60 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे . 10 पथकांसाठी एका वैद्यकीय अधिकायाची नियुक्ती करण्यात आली असून या पथकात अंगणवाडी सेविका , आरोग्य सेविका , आशा वर्कर यांचा समावेश आहे. या परिसरातील कोणत्या व्यक्तीला सर्दी , ताप खोकला याचा त्रास आहे का ? याची तपासणी या पथकांच्या माध्यमातून केली जात आहे . जवळपास तीनो पोलिस कर्मचारी या भागात तैनात केलेले आहेत.
--------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment