राज्यात 'या' तारखेनंतर एकही कोरोनाचा रूग्ण मिळणार नाही; पाहा कुणी केलाय हा दावा - Mangalwedha Times

Breaking

Thursday, April 30, 2020

राज्यात 'या' तारखेनंतर एकही कोरोनाचा रूग्ण मिळणार नाही; पाहा कुणी केलाय हा दावा


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा धूमाकूळ सुरू आहे. रोज नव्या रूग्णांची मोठ्या संख्येने भर पडत आहे. अशातच मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाने एक अभ्यासपूर्ण निष्कर्ष काढला आहे. यामध्ये त्यांनी 21 मे नंतर राज्यात एकही कोरोनाचा नवा रूग्ण आढळणार नाही, असा दावा केला आहे.


मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाने काही मॉडेल्सच्या आधारे या विषाणूचा जोर कधी आणि कसा कमी होऊ शकतो तसंच येणाऱ्या दिवसांत मुंबईसह महाराष्ट्रात विषाणूचा कसा प्रभाव राहू शकतो, याचा अभ्यास केला आहे. या अभ्यासाअंती त्यांनी 21 मे नंतर राज्यात एकही कोरोनाचा नवा रूग्ण आढळणार नाही, असं भाकित केलं आहे.


केरळ, हिमाचल प्रदेश, उत्तरांचल, ओरिसा या राज्यांमध्ये आज नवे कोरोना रूग्ण आढळलेले नाहीत. याचाच अर्थ कोरोनाचा प्रभाव हळू, वेगात,पुन्हा हळू आणि नंतर त्याचा प्रभाव ओसरून तो शून्यावर येतो. अशाच पद्धतीने हा आजार पसरतो आणि संपतो देखील, असं या अहवालात म्हणण्यात आलं आहे.


दुसरीकडे जरी कोरोनाचा प्रभाव आता कमी होण्यास सुरूवात झाली असली तर मुंबई महानगरपालिकेने आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली आहे. महापालिकेने 50 हजार क्वारंटाईन खाटांची व्यवस्था केली आहे तसंच वानखेडे क्रिकेट स्टेडिअम देखील ताब्यात घेण्याच्या हालचाल सुरू आहेत.

--------------------------
ब्रेकिंगनवनवीन ताज्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment