CoronaVirus : लॉकडाऊन अधिक 'कडक' होण्याची शक्यता ? वाचा सविस्तर - Mangalwedha Times

Breaking

Monday, April 27, 2020

CoronaVirus : लॉकडाऊन अधिक 'कडक' होण्याची शक्यता ? वाचा सविस्तरमंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । लॉकडाऊनची मुदत संपण्यास सात दिवस राहिले आहेत; मात्र लॉकडाऊन संपणार की वाढणार, याची खात्री नसतानाच आता लॉकडाऊन अधिक कडक करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी रविवारी सायंकाळी जिल्हाधिकार्‍यांशी बोलताना दिले. सुमारे तीन तास व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी प्रत्येक जिल्ह्याचा सविस्तर आढावा घेतला.


'कोरोना'चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने लॉकडाऊनची घोषणा केली. त्याबरोबरच राज्य शासनाने 24 एप्रिलपासून राज्यात लॉकडाऊनसह संचारबंदी लागू केली. 20 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

    
मात्र, रुग्णांच्या संख्येत वाढ होत गेल्याने हा लॉकडाऊन तीन मेपर्यंत वाढवला आहे.लॉकडाऊनची घोषित केलेली मुदत संपण्यास आता केवळ सात दिवस राहिले आहेत. यामुळे राज्यातील काही भागात तरी तीन मेनंतर लॉकडाऊन उठेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


मात्र, ही अपेक्षा फोल ठरण्याचीच शक्यता अधिक दिसत आहे. पुणे-मुंबईत कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. त्याबरोबर अन्य जिल्ह्यातही रुग्णसंख्येचा वेग गेल्या काही दिवसांत वाढला आहे. यामुळे काही जिल्ह्यांना तीन मेनंतर सवलत मिळेल, याची शक्यता कमी असल्याचे आजच्या व्हिडीओ कॉन्फरसनंतर सांगण्यात येत आहे.


मुख्यमंत्री ठाकरे यांनी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी व्हायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन आणि संचारबंदीची अंमलबजावणी कडक होण्याची शक्यता आहे.

---------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment