LockDown : सोलापुरात ‘संचारबंदी’ हद्द बंदी ; 'या' सेवा वगळता सर्व काही बंद राहणार - Mangalwedha Times

Breaking

Monday, April 20, 2020

LockDown : सोलापुरात ‘संचारबंदी’ हद्द बंदी ; 'या' सेवा वगळता सर्व काही बंद राहणारमंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सध्या सोलापूर शहरांमध्ये कोरोना चा विषाणूमुळे बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे .या विषाणूचा प्रसार रोखणे यासाठी उपाययोजना म्हणून सोलापूर शहरांमध्ये शहर हद्दीमध्ये आज दिनांक 20 एप्रिल ते 23 एप्रिल रात्री बारा वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदी लागू करून शहरातील सर्व आस्थापना व शहराच्या हद्दीत बंद करण्यात येत आहेत असा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिला आहे.


आदेश यांना लागू नाही

अत्यावश्यक वैद्यकीय सेवा करणारे खाजगी व सरकारी रुग्णालय, दवाखाने, आरोग्य सेवा देणारे डॉक्टर, वैद्यकीय सेवेची संबंधित कर्मचारी, त्यांची वाहने तसेच या संदर्भात सर्वेक्षण करणारे अधिकारी व कर्मचारी
ऍम्ब्युलन्स सेवा, रुग्णालयांमध्ये व दवाखान्यात संलग्न असणारे औषधाची दुकाने व इतर औषधांची दुकाने त्यांच्या नियमित वेळेत सुरू राहतील.


कायदेशीर कर्तव्य बजावीत असणारे अधिकारी कर्मचारी, पाणीपुरवठा, अग्निशामक दल, विद्युतपुरवठा पोलिस विभागातील अधिकारी आणि कर्मचारी सकाळी सहा ते नऊ या कालावधीत दूध वाटप व विक्री शहरातील पेट्रोल पंप सकाळी सात ते अकरा तसेच या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवेतील शासकीय वाहने, आरोग्य सेवा देणारी डॉक्टर्स कर्मचारी यांची वाहने व पोलीस विभागाच्या वाहनांना पेट्रोल-डिझेल देण्यात येतील.


सदर आदेशाचा उल्लंघन केल्यास त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असेही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी स्पष्ट केलं आहे.

--------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment