सोलापूरचे पालकमंत्री दुसऱ्यांदा बदलले राष्ट्रवादीचे दत्ता भरणे नवे पालकमंत्री - Mangalwedha Times

Breaking

Wednesday, April 22, 2020

सोलापूरचे पालकमंत्री दुसऱ्यांदा बदलले राष्ट्रवादीचे दत्ता भरणे नवे पालकमंत्री


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । गृहनिर्माण मंंत्री ,राष्ट्रवादीचे नेते व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांना रूग्णालयात दाखल केलं गेलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना ठाण्यातल्या एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पीटीआयने यासंबंधीचं वृत्त दिलं आहे.


गेल्या आठवड्यात आव्हाड कोरोनाबाधित रूग्णाच्या संपर्कात आले होते. त्यानंतर त्यांनी कोरोनाची चाचणी देखील केली होती. माझी चाचणी निगेटीव्ह आली आहे, असं ट्विट करून त्यांनी संबंध महाराष्ट्राला देखील सांगितलं होतं. त्यानंतर आता जवळपास 13 दिवसांनंतर आव्हाडांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.त्यामुळे आता दुसऱ्यांदा पालकमंत्री बदलून दत्ता भरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


राज्यांमध्ये महाविकासआघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर दिलीप वळसे - पाटील यांची सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री नियुक्ती झाली होती. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे पालकमंत्री पदाची जबाबदारी काढावी, अशी विनंती केल्यानंतर त्यांच्याकडील पालकमंत्रिपद जितेंद्र आव्हाड यांच्याकडे दिले होते.


आव्हाड यांनी सोलापुरात येऊन पालकमंत्री पदाचा पदभार घेऊन दमदार एन्ट्री केली होती.एक बैठक घेऊन मुंबईला रवाने झाले असता कोरोनाबाधित पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आल्याने त्यांनी स्वतःला होम क्कारांटाईन करून घेतले होते.मात्र त्यांना काल रात्री अतिदक्षता विभागात हलवले आहे. पालकमंत्री विना पुन्हा सोलापूर जिल्हा पोरका झाला.


त्यामुळे सोलापुरातील पदाधिकाऱ्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून सोलापूर जिल्ह्यात जिल्ह्याचा पालकमंत्री नियुक्त करण्याची मागणी केली. त्यानुसार अजित पवार यांनी दत्ता भरणे यांची सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्त करणार असल्याचे आश्वासन दिले होते.त्यानुसार आज आदेश काढून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

-----------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment