पंढरपुरात उपचार घेतलेल्या ‘त्या’ महिलेमुळे मंगळवेढा,बार्शी,करमाळा,सांगोला,माढ्याचे वाढले टेन्शन! - Mangalwedha Times

Breaking

Wednesday, April 29, 2020

पंढरपुरात उपचार घेतलेल्या ‘त्या’ महिलेमुळे मंगळवेढा,बार्शी,करमाळा,सांगोला,माढ्याचे वाढले टेन्शन!मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । पंढरपुरातील एका नामांकित खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेली मोहोळ तालुक्यातील पेनुर- पाटकुल येथील महिला कोरोना बाधित आढळली आहे. या महिलेने 21 ते 24 एप्रिल दरम्यान पंढरपुरातील रुग्णालयात उपचार घेतला. त्या महिलेशेजारी या हॉस्पिटलमध्ये असलेल्या इतर लोकांची माहिती पोलिसांनी संकलित केली आहे. या माहितीमध्ये मंगळवेढा, माढा, पंढरपूर, मोहोळ, सांगोला, करमाळा व बार्शी या भागातील रुग्ण या महिलेसोबत उपचार घेत असल्याचे समोर आले आहे.


त्या कोरोनाबाधित महिलेने सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचे टेंशन वाढविले असल्याची माहिती समोर आली आहे. माढा गावासह मोडनिंब, तुळशी, पंढरपूर तालुक्यातील आंबे, भोसे, वडाचीवाडी, तारापूर, कासेगाव, कोर्टी, खेड भोसे, करकंब,  सुस्ते, गादेगाव, वाडीकुरोली, तावशी, चळे, खर्डी, फुलचिंचोली व पंढरपूर शहरातील रुग्णांनी त्या महिलेसोबत उपचार घेतले आहेत.


मंगळवेढा तालुक्यातील मंगळवेढा शहर, तळसंगी, मरवडे, सांगोला तालुक्यातील सांगोला शहर, चिकमहुद, घेरडी, अजनाळे, बार्शी शहर, मोहोळ तालुक्यातील औंढी, पेनुर, सौंदणे, तेलंगवाडी येथील देखील रुग्ण या महिलेसोबत पंढरपुरातील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते.


करमाळा तालुक्यातील केम यासह जिल्ह्यातील विविध गावातील एकूण 61 रुग्णांची यादी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी तयार केली आहे. हे ६१ जण ज्या गावातील आहेत त्या सर्व रुग्णांची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. ही तपासणी करण्याबाबतची कार्यवाही संबंधित पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी यांच्या मदतीने करायची आहे.

---------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment