Breaking : सोलापुरात कोरोना रुग्णाचा आकडा 41 वर तर मृतांची संख्या 4 वर - Mangalwedha Times

Breaking

Friday, April 24, 2020

Breaking : सोलापुरात कोरोना रुग्णाचा आकडा 41 वर तर मृतांची संख्या 4 वर


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापुरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 41 झाली आहे.आज आणखीन दोन रुग्ण बापुजी नगर भागात  मिळून आले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही माहिती दिली.


सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या 41 झाली असून त्यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतरांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आजचे दोन्ही रुग्ण पुरुष आहेत.एका महिलेला बापुजी नगर भागातून सारीचा त्रास होऊ लागल्याने 20 एप्रिल ला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

तिचा आज सायंकाळी मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांची संख्या 4 झाली आहे.आतापर्यंत सोलापुरात कोरोना  चाचणीसाठी 907 जणांचे स्वॅब घेण्यात आले यातील 866 जणांची चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे .तर 41 ज
जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

सोलापूर शहरात आज आज सकाळी संचारबंदीत अत्यावश्यक अन्नधान्य भाजीपाला खरेदीसाठी सवलत देण्यात आली होती. मात्र या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर आले सोशल डिस्टन्स चा बोजवारा उडाला अखेर पोलीस प्रशासनाने काठीचा धाक दाखवीत लोकांना तसेच विक्रेत्यांना हुसकावून लावलं काही जणांची दुचाकी ,चारचाकी वाहनही पोलिसांनी जप्त केली आहेत.


उजनी- सोलापूर या पाईपलाईनचा वॉल फोडून पाणी घेतल्याप्रकरणी महापालिका अधिकाऱ्यांनी अज्ञात इसमा विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे कारण नजीक हा प्रकार आज उघडकीस आला दरम्यान या पाईपलाईन मधून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेलं. पाईपलाईन दुरुस्त करण्यात आली असल्याचं पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं.

----------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment