Breaking : सोलापुरात कोरोना रुग्णाचा आकडा 61 वर तर मृतांची संख्या 5 वर - Mangalwedha Times

Breaking

Sunday, April 26, 2020

Breaking : सोलापुरात कोरोना रुग्णाचा आकडा 61 वर तर मृतांची संख्या 5 वरमंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 हजार 363 झाली असून विभागात 213 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 1 हजार 66 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 85 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 46 रुग्ण  गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.


विभागात 1 हजार 363 बाधित रुग्ण असून 85 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 1 हजार 230 बाधीत रुग्ण असून 77 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 33 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयात 61 बाधीत रुग्ण असून 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 29 बाधीत रुग्ण असून  एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर  जिल्हयात 10 बाधीत रुग्ण आहेत. 

सोलापूर जिल्ह्यामधील  कोरोना बाधिताची संख्या आता 61 इतकी झाली आहे. यातील 5 जणांचा आतापर्यंत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

कालपर्यंत ही संख्या 50 इतकी होती ,आज एका दिवसात 11 पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आले आहेत.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही  माहिती आज रात्री 9.30 वाजता ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली.
आज मिळालेले रुग्ण अकरा आहेत यात एका 57 वर्षीय महिलेचा समावेश आहे सारी आजारामुळे या महिलेचा काल दाखल करण्यात आलं होतं आज तिचा मृत्यू झाला तिचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला आहे इतर रुग्णांमध्ये 2 शास्त्रीनगर ,आणी प्रत्येकी एक पाच्छा पेठ, कुरबान हुसेन झोपडपट्टी, नई जिंदगी, तालुका पोलीस स्टेशन परिसर, यशवंत सोसायटी, कर्णिक नगर, आयकर नगर  आणि एस आर पी वसाहत तर मोहोळ तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.


आत्तापर्यंत 12 28 रुग्णांपैकी 1052  जणांचे अहवाल आले आहेत .यात 991 निगेटिव्ह तर 61 पॉझिटिव्ह अहवाल आहेत. अजून काही अहवाल प्रतीक्षेत आहेत.सोलापूर जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्ग स्थितीची माहिती घेण्यासाठी केंद्रीय तज्ञांची समिती  उद्या सोलापूर दौऱ्यावरयेणार आहे.


कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने सर्वेक्षण सुरू आहे, या चाचण्यांची संख्या वाढवा .सर्वेक्षणात माहिती न देणाऱ्या किंवा माहिती लपवणारयांवर गरज भासल्यास पोलीस कारवाई करा, अशा सूचना आज पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या आहेत.


दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी या गावी बंदी असतानाही ही नागम्मा देवीची यात्रा भरवल्या प्रकरणी गावातील सरपंचासह, देवस्थान पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी विरुद्ध  कारवाई करण्यात येणार आहे.
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले, प्रत्येक गावकऱ्यांनी आपल्या गावात कोणी नवीन व्यक्ती येत आहे का? यावर लक्ष ठेवावं. त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा .नांदणी यात्रेची गंभीर दखल घेतली असून यात्रा भरवणाऱ्या विरुद्ध कडक कलमान्वये कारवाई करण्यात येणार आहे.


सोलापूर शहर पोलिसांनी आजही संचारबंदी आणि आपत्ती निवारण कायद्याचा भंग करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाया केल्या आहेत. यात वाहन घेऊन फिरणे , विनाकारण फिरणे मास्क न लावता फिरणे. नमाज साठी एकत्र जमणे - गर्दी करण जनावरांची बेकायदा वाहतूक करणं या विरोधात केलेल्या कारवाईचा समावेश आहे.

सोलापूर शहर पोलिसांनी आज शहराच्या विविध भागात सकाळी संचलन केलं. यावेळी नागरिकांनी अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करून आरती ओवाळून या संचलनातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे स्वागत केलं.

----------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment