ब्रेकिंग : सोलापुरात एक रुग्ण वाढला 'हा' परिसर कंटेनमेंट झोन जाहीर-जिल्हाधिकारी - Mangalwedha Times

Breaking

Friday, April 17, 2020

ब्रेकिंग : सोलापुरात एक रुग्ण वाढला 'हा' परिसर कंटेनमेंट झोन जाहीर-जिल्हाधिकारीमंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापूर शहरातील जोशी गल्ली, रविवार पेठेत कोरोनाचा नवा रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण पहिल्या १२ रुग्णांच्या संपर्कातील नाही. हा रुग्ण पोलीस असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, शहरातील कोरोनाच्या रुग्णाची संख्या १३ वर पोहोचली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.


रविवार पेठेत राहणारा हा रुग्ण मुंबई पोलिस दलात कामाला आहे. आठ दिवसांपूर्वी तो सोलापुरात आला होता. त्याच्या हातावर होम व्कारंटाइनचा शिक्का होता. त्याला बरे वाटत नव्हते.


त्यामुळे तीन दिवसांपूर्वी तो उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल झाला. या ठिकाणी त्याचे स्वॅब घेण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी त्याची स्वॅब चाचणी पॉझीटिव्ह असल्याचे आढळून आली.


आठ दिवसांपूर्वी शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. या रुग्णाच्या संपर्कातील १४८ जणांचे स्वॅब घेतल्यानंतर २ दोन जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यातील एका महिलेच्या संपर्कातील ९ जणांचा कोरोनाची लागण झाली होती. आता रविवार पेठेतील जोशी गल्लीमध्ये रुग्ण आढळून आला आहे.
------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment